“तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा” हे कानावर पडताच जिचा चेहरा डोळ्यासमोर येतो ती म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता तिच्या कामात जरी व्यस्त असली तरी ती तिच्या सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते. महाराष्ट्राची हास्य जत्रेतून सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाने, सौंदर्याने प्रेक्षकांच्या माणची सूत्र देखील व्यस्थ ठेवते असं म्हणालीला हरकत नाही. सूत्रसंचलनासोबतच प्राजक्ताचा अभिनय ही तितकाच प्रेक्षणीय आहे. सोशल मीडिया अकाउंट्स वरून विविध फोटो पोस्ट करत असते. प्रेक्षक ही प्राजक्ताच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत असतात.(Prajaktta Mali)
प्राजक्ताने यंदाच्या महाशिवरात्री निमित्त प्राजक्ताने ठरवल्या प्रमाने बंगलोर मधील श्री श्री रवी शंकर गुरुदेव यांच्या आश्रमात हजेरी लावली होती. आश्रमात विविध कार्यक्रमांचा आनंद घेतल्या नंतर श्री रवी शंकर गुरुदेव यांच्याशी सवांद साधताना प्राजक्ताने एक भन्नाट प्रश्न गुरुदेव यांना विचारला आणि स्वामीजींनी ही त्यावर धमाल उत्तर दिलं. त्यांचं हे संभाषण नुकताच प्राजक्तने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केलं आहे.

तर प्राजक्ताने गुरुदेवांना ये शादी करना कंपल्सरी है क्या? असा प्रश्न विचारला आणि ब्रम्हचारी असलेल्या गुरुदेव यांनी उत्तरादखल ‘ ये सवाल आप हमसे पुछ रही है? अगर ऐसा होता तो हमारे बगल मै और एक खुर्सी होती’ असं धमाल उत्तर दिल आणि एकच अशा पिकला. पुढे श्री रवी शंकर म्हणाले असं काही गरजेचं नसत तर खुश राहणं गरजेचं असत.
प्राजक्ताने आश्रमातील विविध फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत. तर श्री रवी शंकर गुरुदेव यांच्या भेटीचा देखील फोटो तिने पोस्ट केला आहे. तर तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जय जय गुरुदेव अशा कमेंट्स केल्या आहेत.(Prajaktta Mali)
====
हे देखील वाचा- ‘ही’ अभिनेत्री घेणार विशाखाची जागा हास्य जत्रेच्या स्किट मध्ये दिसणार समीरची नवीन बॉस
====
नुकतच प्राजक्ताने तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड लाँच केला असून ‘प्राजक्तराज’ असे तिच्या ब्रँडच नाव आहे.