प्रत्येक माणूस कामाच्या व्यस्ततेनंतर जेव्हा काही काळ विश्रांतीसाठी जातो, तेव्हा त्याच्याकडे विश्रांतीचे अनेक पर्याय असतात. कधी बाहेरच्या वातावरणात मनसोक्तपणे फिरणं, तर कधी एखाद्या आश्रमात जाऊन मौनव्रत धारण करणं. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हीदेखील अनेक ठिकाणी मनसोक्त फिरतेच, शिवाय ती अनेकवेळा आश्रमात जाऊन मौनव्रत धारण करते. (prajakta mali)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीचं करिअर जोरदार सुरु आहे. प्राजक्ताने आजवर अनेक मालिका व चित्रपटांत काम केलेलं असून तिने साकारलेल्या विविध धाटणीच्या भूमिकांमुळे अल्पावधीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिवाय सोशल मीडियावरही तिची जादू कायम असून तिच्या कोणत्याही लूकवर चाहते नेहमीच घायाळ होतात. एकीकडे तिच्या लूकची चर्चा होत असताना कधीकधी प्राजक्ताला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. असाच एक फोटो प्राजक्ताने नुकताच पोस्ट केला असून तिच्या या पोस्टवर नेटकरी काहीसे नाराज आहेत. (prajakta mali instagram post)
पहा प्राजक्ता माळीची इंस्टाग्राम पोस्ट (prajakta mali instagram post)
अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘आर्ट ऑफ लिविंग’च्या ऍडव्हान्स कोर्ससाठी त्रिवेणी आश्रमात गेलेली असून तिथं तिने मौनव्रत धारण केल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच केला होता. तिने हा कोर्स पूर्ण केला असून त्याची माहिती तिने आपल्या चाहत्यांना इंस्टाग्राम पोस्टद्वारे कळवली. या इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्राजक्ता तिच्या गुरूंच्या चरणांशी बसलेली असून त्या आश्रमातील काही फोटोज प्राजक्ताने शेअर केले आहे. हे फोटोज शेअर करताना प्राजक्ता म्हणते, “Done with The Art of living’s advance course… ???? A mandatory thing once in 3 months… Combination of #pranayan #yog #meditation #music #satvikliving #satvikfood #panchakarma #nature and much more. Grateful for having this knowledge in life. Now can’t imagine life without dhyan. Can’t thank enough to my both the teachers Seema didi and Kedar bhaiyya. Guru grace… @srisriravishankar ????” असं लिहीत तिने या कोर्सबद्दलची माहिती शेअर केली.
मात्र तिच्या या पोस्टवर एक नेटकरी नाराज असून त्याने कमेंट करून लिहिलंय, “महाराजांच्या नादी लागून भले भले येडे झाले बाई”. तर काहींनी या पोस्टवर मजेशीर कमेंट करत लिहिलंय, “प्राजक्ता तू सन्यासी होणार वाटतंय ????”. हे सोडता अनेकांनी मात्र प्राजक्ताचे भरभरून कौतुक केलंय.
हे देखील वाचा : म्हणून भर पाऊसात ‘महालक्ष्मी ते दादर’ रेल्वे रुळावरून धावत गेले मामा