‘बाहुबली’ फेम साऊथचा स्टार प्रभासचा आगामी सिनेमा ‘Project K’चा धमाकेदार टिझर समोर आला असून टिझर रिलीज करण्यासोबत सिनेमाचे नावही बदलण्यात आलेलं आहे. प्रभासच्या या आगामी सिनेमाचं नाव “Kalki 2898 AD” असं राहणार असून यात महानायक अमिताभ बच्चन, कमल हसन, दीपिका पादुकोण यांचीही महत्वाची भूमिका आहेत. सिनेमाचा टिझर रिलीज सोशल मीडियावर ट्रेंड होत असून टिझरला अवघ्या १२ तासात तब्बल ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या. (Project K Teaser)
सिनेमाच्या टिझरनुसार ही गोष्ट भविष्यकाळातील असून जगभरात अंधाराचे राज्य कसे प्रस्थापित झाले ? हे यात दाखवण्यात आले. नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या अॅक्शनपॅक सिनेमात प्रभासला भगवान विष्णूचा कल्की अवतार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन हे पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या एका योद्धाच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. तर दीपिका आर्मी जॉईन करताना दिसते.

अमेरिकेतील सॅन दिएगो येथे सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आला. यावेळी प्रभाससोबत अभिनेते कमल हसन, दिग्दर्शक नाग अश्विन, अभिनेता राणा दग्गुबत्ती व सिनेमाचे निर्माते हे उपस्थित होते, तर अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांनी सोशल मीडियावर सिनेमाचा टिझर शेअर केला. हा सिनेमा हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. (Prabhas’s Project K teaser released)
𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓-𝐊 is now #Kalki2898AD 💥
— Prabhas (@PrabhasRaju) July 20, 2023
Here's a small glimpse into our world: https://t.co/Upooty3mC8#Prabhas @SrBachchan @ikamalhaasan @deepikapadukone @nagashwin7 @Music_Santhosh @VyjayanthiFilms @Kalki2898AD pic.twitter.com/vC0KG07MQd
काही दिवसांपूर्वी सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक समोर आला होता. पण प्रभासच्या या लूकवरुन नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केल्यानंतर काही तासांतच दुसरा पोस्टर रिलीज केला. नव्या पोस्टरमध्ये प्रभास एकदम अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. (Project K Teaser)
हे देखील वाचा : पिळगांवकरांच्या लेकीचा मालदीवमध्ये बोल्ड अंदाज