सध्या कलाकार मंडळींचा व्हॅकेशन मोड सुरु आहे. अशातच मराठी सिनेविश्वातील एक लोकप्रिय कुटुंबही मागे राहिलेलं नाही. कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ही कलाकार मंडळी परदेश दौरा करत आहे. पिळगांवकर कुटुंबीय सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर या लोकप्रिय जोडीपाठोपाठ त्यांची लेक श्रिया पिळगांवकर हिने ही अभिनयक्षेत्रात आपला जम बसवला आहे. (Shriya Pilgaonkar Maldives diaries)
सध्या श्रिया तिच्या आई बाबांसोबत मालदीव ट्रीपवर गेली असून तेथील एन्जॉय करतानाचे अनेक फोटोस श्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. श्रिया पिळगावकर मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत आहे. श्रियाने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर वरून फोटो शेअर केले आहेत.
पाहा श्रियाची फॅमिलीसोबतची मालदीव ट्रिप (Shriya Pilgaonkar’s Maldives diaries)
ज्यात श्रिया आणि तिचे कुटुंब मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटों दरम्यान श्रिया वॉटर स्पोर्ट्स करताना आणि समुद्रकिनाऱ्यावर सुंदर दृश्यांसह आराम करताना दिसली. तिने या फोटोंना “Sun, Sand & Showers with my cuties.” असं कॅप्शन दिले आहे. तिने निऑन स्विमसूट घालून केलेलं फोटोशूट लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – Openheimer VS Barbie : कोण ठरणार कोणावर भारी ? जाणून घ्या…
श्रियाने मालदीवच्या समुद्रकिनारी मोनोकीनीत केलेलं फोटोशूट पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. शिवाय श्रिया सोबत सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकरही वॉटर स्पोर्टचा आनंद घेताना दिसत आहेत, सचिन यांनी इंस्टाग्राम पोस्ट करत ही मालदीव ट्रिप त्यांच्यासाठी श्रियाने प्लॅन केली असल्याचेही सांगितले आहे.