वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका या प्रेक्षकांच्या भेटीस येतात आणि कमी वेळातच प्रेक्षकांना आपलंस करतात. अशीच एक मालिका म्हणजे पोस्ट ऑफिस उघड आहे. नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवल्याने प्रेक्षकांनी देखील या मालिकेला पसंती दर्शवली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजगी व्यक्त केली असताना, या मालिकेच्या निर्मात्यानी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.(Post Office Ughada Aahe)
हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या ” वेट क्लाउड प्रोडक्शन” च्या मार्फत “पोस्ट ऑफिस उघड आहे” ही मालिका तयार झाली. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची पोस्ट सचिन गोस्वामींनी केली होती. त्यावेळी अनेक चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत मालिका बंद करू नका अशी विंनती केली.आणि यावेळी सचिन गोस्वामी यांनी एक घोषणा केली.
या मालिकेचे अनेक कलाकार देखील चाहते आहे.अश्यातच हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री चारुशीला साबळे या देखील या कार्यक्रमाच्या चाहत्या आहेत.त्यांनी “हाय सचिन मी पोस्ट ऑफिस या मालिकेची खूप मोठी चाहती आहे,ही मालिका संपते याच मला खूप वाईट वाटत पण आम्हाला ही मालिका पुन्हा पाहायला नक्की आवडले” अशी पोस्ट केली आहे. यावर सचिन गोस्वामी यांनी कमेंट करत म्हटलंय, धन्यवाद चारुशीलाजी, दुसरा सिझन लवकरच आणू.. खूप खूप आभार असं म्हणत त्यांचे आभार मानले आहेत. तर ही कॉमेंट पाहून अनेक चाहते खुश झालेत.(Post Office Ughada Aahe)
‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती . पण आता तीन महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतल्याने पारगावच्या पोस्टाची अंतिम परीक्षा पार पडली आणि मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवण्यात आला होता. या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, ईशा डे, पृथ्वीक प्रताप, आशुतोष वाडेकर यांबरोबरच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपले भरभरून मनोरंजन केले. तर आता या मालिकेचा दुसरा भाग कधी येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलाय. तर तुम्ही देखील ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत का ? हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.
