हिंदी टीव्हीमधील सर्वात चर्चेत असलेला व तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा १७व्या सीझनला कालपासून सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शोची चर्चा रंगली होती. तितकीच शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. अखेर सलमान खानच्या ग्रँड एन्ट्रीने या शोला सुरुवात झाली. त्यानंतर सलमानने या सर्व स्पर्धकांचे बिग बॉसच्या घरात स्वागत करण्यात आले. (Bigg Boss 17 Grand Premiere)
‘बिग बॉस’च्या यंदाच्या सीझनमध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. हे सर्व स्पर्धक या घरात १०५ दिवसांसाठी राहतील. विशेष म्हणजे, या सीझनची थीम ‘दिल, दिमाग और दम’ असल्याने यंदाचे घर तीन श्रेणीत विभागले आहे. बिग बॉसने शोच्या सुरुवातीलाच या तीन घरांची ओळख करून दिली असून यंदाच्या घराची रचना युरोपीयन आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये अनेक नवीन गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस’च्या या सीझनमध्ये टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोड्यांसह विविध क्षेत्रातील ओळखीचे चेहरे सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये मराठमोळी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनबरोबर शोमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर ‘खतरों के खिलाडी’ फेम ऐश्वर्या शर्मा व पती नील भट, अभिनेत्री मन्नारा चोप्रा, प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी हे देखील सहभागी झाले आहेत.
हे देखील वाचा – मराठमोळा विनोदवीर संकेत भोसले व सुगंधा मिश्रा होणार आई-बाबा! फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून होतंय शुभेच्छांचा वर्षाव
मागच्या सीझनप्रमाणे याही सीझनमध्ये अनेक युट्युबर्स आणि विविध क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती सहभागी झाले आहे. ज्यामध्ये पूर्व गुन्हे पत्रकार जिग्ना व्होरा, नवीद सोल, मोटोव्लॉगर अनुराग डोभाल, सना रईस खान, सोनिया बन्सल, सिंगर खानजादी उर्फ फिरोजा खान, सनी आर्या, रिंकू धवन, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय अशी अनेक नावं आहेत.
हे देखील वाचा – चुलीवरची भाकरी अन् मासे… किशोरी शहाणे यांनी फार्महाऊसवर बनवलं खास जेवण, नेटकरी म्हणाले, “तुमच्या घरी जेवणासाठी…”
दरम्यान, शोच्या ग्रँड प्रिमिअरलाच प्रेक्षकांना एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला. सीझनमध्ये सहभागी झालेल्या दोन कलाकारांमध्ये यावेळी भांडण झालं, जे सोडवायला अखेर सलमानला मध्यस्थी करावी लागली होती. त्यामुळे प्रेक्षकांना यात आणखी काय पाहायला मिळणार आणि हे सर्व स्पर्धक प्रेक्षकांचे कसे मनोरंजन करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.