शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अविवाहितच का राहिले मुकेश खन्ना?, लग्न न करण्यामागचंही सांगितलेलं कारण, एकट्यानेच जगतात आयुष्य

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 13, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mukesh kahnna on marriage

मुकेश खन्ना हे अजूनही अविवाहित का?

टेलिव्हिजनवरील ‘शक्तिमान’ ही मालिका आज इतके वर्ष उलटून गेली तरीही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेमध्ये शक्तिमानची भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती. तसेच त्यांनी महाभारत या मालिकेमध्ये भीष्म पितामह यांची भूमिका साकारली आहे. आजही ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. ते आता ६६ वर्षांचे आहेत. मात्र आजवर त्यांनी लग्न केले नाही. त्यांनी लग्न का केले नाही? असा प्रश्न अनेकदा चाहते त्यांना विचारतात. मात्र त्यांनी यावर कोणतेही उत्तर चाहत्यांना दिले नव्हते. अशातच आता मुकेश अजून अविवाहित का? असे प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले. याचे कारण आता आपण जाणून घेऊया. (mukesh kahnna on marriage)

मुकेश सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. ते अनेक विषयांवर आपले मतदेखील व्यक्त करत असतात. लवकरच ते नवीन पिढीसाठी पुन्हा एकदा ‘शक्तिमान’ ही मालिका घेऊन येत असल्याचे पोस्ट करत जाहीर केले होते. ही घोषणा होताच त्यांचे अनेक चाहते खुशदेखील झाले. मात्र त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मुकेश यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले की, “एक भीष्म प्रतिज्ञा कोणाचे लग्न थांबवू शकते का? लोकांना वाटते की माझ्याबरोबर असे झाले आहे. मी असा विचार करत नाही. लग्न म्हणजे दोन मनं एकत्र येतात. पण आजवर मला अशी व्यक्ती भेटली नाही. कदाचित भविष्यात मिळेल”.

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : एजेंना तुरुंगात टाकण्याचा श्वेताचा जाणीवपूर्वक प्रयत्न, लीला नवऱ्याला निर्दोष सिद्ध करु शकेल का?

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

नंतर मुकेश यांनी एका मुलाखतीमध्येदेखील लग्न न करण्यामागील कारण सांगितलं. ते म्हणाले की, “मी लग्न करण्याचया विरोधात नाही. पण लोक म्हणतात की भीष्म पितामहची भूमिका साकारल्यानंतर मीदेखील त्यांच्यासारखे वागत आहे. पण मला लग्न करायचे असेल तर ते होईल. आता माझ्यासाठी कोणती मुलगी जन्माला येणार नाही. माझे लग्न हा माझा खासगी प्रश्न आहे. माझी कोणीही पत्नी नाही. मी लग्नाच्या विरोधातदेखील नाही.

आणखी वाचा – अंध चाहतीने गायलं गाणं, उत्कर्ष शिंदेने शेअर केली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, “माइकला हात लावताच…”

दरम्यान ‘शक्तिमान’ परत येत असल्याचे संकेत मुकेश खन्ना यांनी दिले आहेत. रविवारी मुकेश खन्ना यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘शक्तिमान’ परत येणार असल्याचं सूचित केलं आहे. मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक जुना फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर खूप चर्चा सुरु आहे.

Tags: mukesh khannashaktimanunmarried
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
14 November 2024 Thursday daily horoscope Due to the auspicious combination of Siddhi Yoga on, all the works of zodiac signs including will be completed

14 November Horoscope : गुरुवारी सिद्धी योगाचा शुभ संयोग घडल्याने मीन राशीसह ‘या’ ५ राशींची सर्व कामे पूर्ण होतील, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.