शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘करिश्मा का करिश्मा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लाल साडी, बांगड्या व नाकात नथ, साध्या लूकने वेधलं लक्ष

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 14, 2024 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Karishma Kaa Karishma

'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘करिश्मा का करिश्मा’ ही मालिका सध्या खूप लोकप्रिय आहे. या मालिकेला २० वर्ष उलटून गेली तरीही आजही सगळी पात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. एक छोटी रोबोटवर आधारित असलेल्या मालिकेला खूप कमी कालावधीमध्ये खूप अधिक लोकप्रियता मिळाली होती. खासकरुन लहान मुलांमध्ये या मालिका अधिक प्रसिद्ध होती. या मालिकेमध्ये करिश्मा ही भूमिका मध्यवर्ती होती. ही भूमिका बालकलाकार झनक शुक्लाने साकारली होती. ही अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री आता सध्या काय करते? कुठे काम करते आणि तिच्या लग्नाबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (Karishma Kaa Karishma)

‘करिश्मा का…’ झनकचा साखरपुडा ७ जानेवारी २०२३ साली पार पडला. एक बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री आता फॅशन ब्लॉगर म्हणून काम करते. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली दिसते. आशातच आता तिच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. नुकतेच तिचे लग्न पार पडले असून तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ती तिचा बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशीबरोबर लग्नबंधनात अडकली आहे.

आणखी वाचा – समीर वानखेडेंच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी फोडले फटाके, क्रांती रेडकरने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली, “तुम्ही सर्व आमच्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by Kamlesh Pithava (@bhagvati_photostudio)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये झनकने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच सोनेरी रंगाचा काठ असलेली ओढणीदेखील घेतली आहे. तसेच तिचा नवरा स्वप्नीलने पांढऱ्या-सोनेरी रंगाची शेरवानी घातली आहे. झनकचा साधा मेकअप अधिक लक्षवेधी ठरला आहे. तसेच सोन्याचा हार, बांगड्या, मांग टीका व नथीने लूक पूर्ण केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.

आणखी वाचा – Video : तुरुंगात रात्र काढल्यानंतर घरी परतताच अल्लू अर्जुनच्या पत्नीला अश्रू अनावर, समोर येताच घट्ट मिठी मारली अन्…

वयाच्या १५व्या वर्षानंतर लाईमलाइटपासून दूर राहिली आहे. याबद्दल तिने ‘ईटाइम्स’बरोबर संवाद साधताना सांगितले होते. ती म्हणाली की, “ ‘करिश्मा का करिश्मा’ नंतर ती ‘कल हो ना हो’ व ‘वन नाइट विथ द किंग’मध्ये काम मिळालं. मात्र त्यानंतर मी शिक्षणाला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला”. सध्या तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचा स्वतःचा साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायाला खूप पसंतीदेखील मिळत आहे. तिला डोंगरदऱ्यांमध्ये रहाण्याची आवड असल्याचेदेखील सांगितले आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.    

Tags: jhanak shuklaKarishma Kaa Karishmatelevision serialwedding
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Raj Kapoor 100th Birth Anniversary

राज कपूर यांची १०० वी जयंती कपूर कुटुंबियांकडून थाटामाटात साजरी, कार्यक्रमाला अवघं बॉलिवूड लोटलं, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.