टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘करिश्मा का करिश्मा’ ही मालिका सध्या खूप लोकप्रिय आहे. या मालिकेला २० वर्ष उलटून गेली तरीही आजही सगळी पात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. एक छोटी रोबोटवर आधारित असलेल्या मालिकेला खूप कमी कालावधीमध्ये खूप अधिक लोकप्रियता मिळाली होती. खासकरुन लहान मुलांमध्ये या मालिका अधिक प्रसिद्ध होती. या मालिकेमध्ये करिश्मा ही भूमिका मध्यवर्ती होती. ही भूमिका बालकलाकार झनक शुक्लाने साकारली होती. ही अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री आता सध्या काय करते? कुठे काम करते आणि तिच्या लग्नाबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (Karishma Kaa Karishma)
‘करिश्मा का…’ झनकचा साखरपुडा ७ जानेवारी २०२३ साली पार पडला. एक बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री आता फॅशन ब्लॉगर म्हणून काम करते. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली दिसते. आशातच आता तिच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. नुकतेच तिचे लग्न पार पडले असून तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ती तिचा बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशीबरोबर लग्नबंधनात अडकली आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये झनकने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच सोनेरी रंगाचा काठ असलेली ओढणीदेखील घेतली आहे. तसेच तिचा नवरा स्वप्नीलने पांढऱ्या-सोनेरी रंगाची शेरवानी घातली आहे. झनकचा साधा मेकअप अधिक लक्षवेधी ठरला आहे. तसेच सोन्याचा हार, बांगड्या, मांग टीका व नथीने लूक पूर्ण केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.
वयाच्या १५व्या वर्षानंतर लाईमलाइटपासून दूर राहिली आहे. याबद्दल तिने ‘ईटाइम्स’बरोबर संवाद साधताना सांगितले होते. ती म्हणाली की, “ ‘करिश्मा का करिश्मा’ नंतर ती ‘कल हो ना हो’ व ‘वन नाइट विथ द किंग’मध्ये काम मिळालं. मात्र त्यानंतर मी शिक्षणाला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला”. सध्या तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचा स्वतःचा साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायाला खूप पसंतीदेखील मिळत आहे. तिला डोंगरदऱ्यांमध्ये रहाण्याची आवड असल्याचेदेखील सांगितले आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.