Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी यांनी चंचलगुडा तुरुंगात एक रात्र घालवून घरी परतल्यावर अभिनेत्याचे घट्ट अशी मिठी मारुन स्वागत केले. गेल्या आठवड्यात त्याच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात एका चाहत्याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात तो तुरुंगात होता. शनिवारी सकाळी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये स्नेहा अर्जुनची बाहेर वाट पाहत होती. त्यांच्याबरोबर त्यांची मुलेही दिसली. अर्जुन तिच्या जवळ येताच स्नेहाने त्याला घट्ट मिठी मारली. पतीला भेटल्यानंतर पत्नी भावूक झालेली पाहायला मिळाली. स्नेहाचा पतीला भेटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर शनिवारी अर्जुनने पत्रकारांशी संवादही साधला.
तुरुंगाबाहेर पत्रकारांशी बोलताना अर्जुन म्हणाला, “मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि सहकार्य करीन. मी पुन्हा एकदा कुटुंबाप्रती शोक व्यक्त करु इच्छितो. ही एक दुर्दैवी घटना होती”. अर्जुनची शनिवारी सकाळी तुरुंगातून सुटका करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जामिनाच्या आदेशाची प्रत अधिकाऱ्यांना न मिळाल्याने तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करुनही त्याला शुक्रवारी रात्र तुरुंगात काढावी लागली. चंचलगुडा तुरुंगात त्याचे वकील अशोक रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले की, “त्याची सुटका करण्यात आली आहे”.
आणखी वाचा – लग्नाच्या १२ वर्षांनंतर राधिका आपटे झाली आई, दाखवली बाळाची पहिली झलक, स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल
❤️❤️ #AlluArjun pic.twitter.com/8aXyoxzq5c
— Sai Mohan 'NTR' (@Sai_Mohan_999) December 14, 2024
त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्जुनला ‘स्पेशल कॅटेगरी कैदी’ म्हणून तुरुंगात ठेवण्यात आले होते. पुष्पा अभिनेत्याला शुक्रवारी सकाळी त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आणि दिवसभरातील नाट्यमय घडामोडी उलगडल्या. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळवला. अर्जुनला हायकोर्टाच्या आदेशाच्या काही वेळापूर्वीच चंचलगुडा तुरुंगात ठेवण्यात आले होते. जेलमधून सुटका अभिनेत्याला त्याच्या निवासस्थानी नेण्यात आले आणि तो त्याच्या कुटुंबाला मिठी मारताना दिसला.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारूला दुसऱ्या मुलाबरोबर पाहून आदित्यचा जळफळाट, प्रेमात पडल्याची जाणीव होणार का?
अभिनेत्याच्या वकिलाने दावा केला की, उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत असूनही तुरुंग प्रशासनाने अभिनेत्याला सोडले नाही. “तुम्ही सरकार आणि विभागाला विचारले पाहिजे की त्यांनी आरोपीची सुटका का केली नाही. उच्च न्यायालयाचा आदेश अतिशय विशिष्ट आहे. ज्या क्षणी तुम्हाला (तुरुंग अधिकाऱ्यांना) आदेश मिळेल, (त्यांनी) त्याची सुटका करावी. स्पष्ट आदेश असूनही, त्यांनी सुटका केली नाही, ही बेकायदेशीर नजरकैद आहे, असे अशोक म्हणाले.