सुप्रसिद्ध हिंदी मालिका ‘बा बहू और बेबी’ ही मालिका माहीत नसलेले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असतील. या मालिकेतील गट्टू ही भूमिका अधिक लोकप्रिय ठरली. ही भूमिका अभिनेते देवेन भोजानी यांनी साकारली आहे. याबरोबरच त्यांनी साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘देख भाई देख’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘एक महल हो सपनो का’, ‘खिचडी’, ‘रिमोट कंट्रोल’, ‘भाकरवडी’, ‘वागळे की दुनिया’ अशा मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शनदेखील केले आहे. तसेच त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्येदेखील काम केले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेऊया. (Baa Bahoo Aur Baby fame gattu)
देवेन यांनी १९८७ साली शंकर नाग यांची प्रसिद्ध मालिका ‘मालगुडी डेज’ मधून टेलिव्हिजनवर काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी नित्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांना ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेसाठी त्यांना तीन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला. या मालिकेमध्ये त्यांनी दुष्यंत ही भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी १९९२ साली आमीर खानची मुख्य भूमिका असलेला ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मंसूर खान यांचे सहाय्यक म्हणून काम केले. यामध्ये त्यांनी ‘घनसू’ ही भूमिकादेखील साकारली होती.
त्यानंतर ‘बा बहू और बेबी’ या मालिकेसाठी क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम केले. यामध्ये त्यांनी साकारलेल्या गट्टू या भूमिकेला अधिक पसंती मिळाली. यामधील त्यांचे विनोदाचे टायमिंग प्रेक्षकांची अधिक वाहवाह मिळाली होती. दरम्यान २१ जुलै रोजी त्यांनी एक मुलाखत शेअर केली होती. यामध्ये एका एक्स युजरने त्यांच्यासाठी शोक व्यक्त केला होता. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते की, “त्यांनी आपल्याला हसवलं आहे. खूप शांत आत्मा आहे त्यांचा. देव त्यांच्या आत्म्यास शांती मिळो”.
यानंतर २२ जुलैला लगेचच देवेन यांनी लगेचच मृत्यूच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं की, “हॅलो, हॅलो, हॅलो, मी जीवंत आहे रे”. सध्या त्यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, गेल्या दोन वर्षांपासून ते टेलिव्हिजनपासून दूर आहेत. ते ‘डंकी’, ‘स्कूप’ व अग्निपथ या चित्रपटांमध्येदेखील दिसून आले होते.