प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला कुतुहूल वाटतं. यासाठी कलाकार विविध माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सध्या सोशल मीडियाचा जमाना, त्यामुळे बरेचसे कलाकार याच माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक गोष्टी अनेकदा शेअर करतात. अशातच मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने नुकतीच एक आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली आहे. (Kiran Mane buys a New Car)
सर्वसामान्यांप्रमाणे प्रत्येक कलाकाराला वाटतं की, आपली स्वतःच्या मालकीची एक ड्रीम कार असावी. प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी अशीच इच्छा एकेकाळी व्यक्त केली होती. मात्र आता ही इच्छा पूर्ण झाली असून किरण यांनी नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसमोर शेअर केली आहे. किरण यांनी नुकतीच मर्सिडीज बेंझ ही आलिशान कार खरेदी केली आहे. याचे काही फोटोज त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
हे देखील वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी अडकणार लवकरच विवाहबंधनात? रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर
शेअर केलेल्या या फोटोमध्ये किरण हे त्यांची ड्रीम कार चालवताना दिसत आहे. ड्रीम कारबरोबर फोटो घेताना अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. हा फोटो शेअर करत ते म्हणाले, “ही मोठी गोष्ट नाही माझ्या मित्रांनो, पण ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. मी जेव्हा तारुण्यात होतो, तेव्हा मर्सिडीज बेंझ कार घेण्याची माझी मनापासून इच्छा होती. ते स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. माझ्या प्रिय मर्सी, तुझे आमच्या कुटुंबात स्वागत आहे.” या पोस्टवर कलाकारांसह चाहत्यांनी कमेंटद्वारे अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा – शाहरुख खानच्या ‘जवान’ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आतापर्यंत कमवले तब्बल इतके कोटी
किरण माने यांना मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखलं जातं. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटीलची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. मात्र, यादरम्यान झालेल्या वादानंतर त्यांनी या मालिकेला रामराम केला होता. पुढे ते ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले, आणि आपल्या दमदार खेळीच्या जोरावर ते टॉप ५ पर्यंत पोहोचले. या कार्यक्रमामुळेच त्यांची लोकप्रियता वाढली. सध्या किरण ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्सची नेहमीच चर्चा होते.