दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. तिच्या वडिलांच्या निधनानंतर आता साऊथ सिनेसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेत्री शोभिता शिवन्नाने वयाच्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्री तिच्या हैदराबादच्या घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. तिच्या निधनाचे धक्कादायक वृत्त समोर आल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. तसेच अभिनेत्रीची शेवटची सोशल मीडिया पोस्टही सध्या व्हायरल होत आहे. (shobhitha shivanna death)
ETimes च्या वृत्तानुसार, कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना तिच्या हैदराबादच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. ३० नोव्हेंबरच्या रात्री उशिरा तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. काही वृत्तांनुसार, अभिनेत्रीचे अंतिम संस्कार बेंगळुरूमध्ये केले जाऊ शकतात.
शोभिता कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी होती. पण गेल्या दोन वर्षांपासून ती हैदराबादमध्ये राहत होती. त्यांच्या आकस्मित मृत्यूने चाहत्यांबरोबरच कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणींनाहा उजाळा दिला आहे
आणखी वाचा – अमृता खानविलकरच्या हाताला दुखापत, चाहत्यांसह कलाकारांनीही व्यक्त केली चिंता, नेमकं झालं काय?
शोभिताने ‘गालीपता’, ‘मंगला गौरी’, ‘कोगिले’, ‘कृष्णा रुक्मिणी’ आणि ‘अम्मावरू’ यासह १० हून अधिक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे. टीव्ही सीरियल्सशिवाय अभिनेत्री ‘एराडोंडला मूरू’ आणि ‘जॅकपॉट’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. शोभिताने तिच्या अलीकडील कन्नड चित्रपट ‘फर्स्ट डे फर्स्ट’ शोचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले होते.
आणखी वाचा – 02 December Horoscope : मेष, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस खास, जाणून घ्या…
शोभिताने शेवटची पोस्ट १६ नोव्हेंबरला इंस्टाग्रामवर शेअर केली होती. हा एक व्हिडिओ होता. ज्यामध्ये तिने एका गायकाचे गिटार वाजवल्याचे रेकॉर्ड केले. दरम्यान, अभिनेत्रीच्या मृत्यूचे वृत्त हे चाहत्यांसाठी धक्कादायक असून अजूनही अनेकांना तिच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये.