मराठी मनोरंजन सृष्टीतली ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत ही नुकतीच विवाहबंधनात अडकली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने पूजाने अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली असून आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.
यानिमित्ताने पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजा व सिद्धेशचा खास लूक पाहायला मिळाला. तसेच वरमाला घालतानाचा खास क्षणही पाहायला मिळाले. यावेळी पूजाची बहीण व आई भावुक झालेली ही पाहायला मिळाली. पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नातील शाही थाटमाट डोळे दिपवणारा होता. “मी काल रात्री पाहिलेल्या सर्वात सुंदर स्वप्नातून जाग आल्यासारखं वाटत आहे. लग्नाला एक महिना झाला यावर विश्वास बसत नाही” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

तर लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पूजाच्या नवऱ्याने तिच्यासाठी खास पदार्थ बनवत या खास दिवसाचे सेलिब्रेशन केले आहे. पूजाच्या नवऱ्याने बायकोसाठी खास पुलाव भात केला असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या खास पदार्थाचा फोटो शेअर केला असून तिने नवऱ्याचे कौतुक केले आहे. “लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवऱ्याने दिलेली खास ट्रीट” असं म्हणत तिने पुलाव भाताचा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, पूजा सावंत ही लग्नानंतर परदेशात आपल्या नवऱ्यासह गेली असून ती लग्नानंतरच्या खास क्षणांचा अनुभव घेत आहे. नुकतेच तिने होळीचे खास सेलिब्रेशनही केले असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या होळी सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले.