शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात, साधेपणाने वेधलं लक्ष, सासरकडची मंडळींचंही साधंच राहणीमान अन्…; फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 22, 2024 | 3:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Sawant Wedding

पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात, साधेपणाने वेधलं लक्ष, सासरकडची मंडळींचंही साधंच राहणीमान अन्…; फोटो व्हायरल

सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या प्रथमेश परबच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. तर काही दिवसांतच तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके ही जोडीही लग्नबंधनात अडकणार आहे. तर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरीही लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ही मराठमोळी, लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. (Pooja Sawant Wedding)

पूजा सावंतने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर म्हणजेच सिद्देश चव्हाणसह रिंग फ्लॉन्ट करतानाचे पाठमोरे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली. अभिनेत्रीचं अरेंज-मॅरेज असून लवकरच पूजा लगीनगाठ बांधणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा शाही साखरपुडा समारंभ थाटामाटात पार पडला. पूजाच्या साखरपुड्यातील फोटो, व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दर्शविली.

आणखी वाचा – दिव्या खोसला व टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांचा १९ वर्षांचा संसार मोडणार?, ज्योतिषाने ‘ती’ गोष्ट सांगता ‘तो’ निर्णय घेतला अन्…

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजाने तिच्या कुटुंबासह सासरच्या कुटुंबीयांची भेट घेत काही फोटो शेअर केले आहे. चव्हाण व सावंत कुटुंब एकत्र आलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूजाने शेअर केलेल्या या फोटोवरुन तिच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मानापमानाचा विधी पार पडताना दिसत आहे.

आणखी वाचा – हेमंत ढोमेचे सासू-सासरे आहेत सुप्रसिद्ध कलाकार, घरी येताच अभिनेत्याने केलं जंगी स्वागत, म्हणाला, “दिवाळी-दसरा…”

पूजाच्या लग्नासाठी सध्या त्यांची जोरदार तयारी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. तसेच पूजाच्या संगीत सोहळ्यासाठीही त्यांची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान पूजा व सिद्देशचा साखरपुड्यातील लूक विशेष चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला. पूजाच्या साखरपुड्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी महाजनी, श्रेयस सावंत, रुचिरा सावंत, सौमिल शृंगारपुरे, फुलवा खामकर यासंह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता सगळेचजण पूजा व सिद्देशच्या लग्नसोहळ्याची वाट पाहत आहेत.

Tags: entertainmentmarathi actressPooja Sawant and siddesh chavanpooja sawant husbandpooja sawant marriagepooja sawant wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Hair Routine Update

केसातील कोंड्यासाठी उपाय करुन थकलात?, घरातच उपलब्ध असलेल्या ‘या’ तीन गोष्टींच्या वापरामुळे मिळेल मुक्ती, तेलामध्ये मिसळा फक्त…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.