मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून आपला अभिनय सिद्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे मुंबईत काल रात्री निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्या बरीच वर्षे आजारपणाने त्रस्त होत्या. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी व हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.(Asha Nadkarni Death)
आशा नाडकर्णी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९५७ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत राहायला आले तेव्हापासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्या केवळ १५ वर्षाच्या होत्या. १९५७ ते १९७३ ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केल्या असून त्या उत्तम नृत्यांगना देखील होत्या.
प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘मौसी’ चित्रपटातून आशा नाडकर्णी यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी नवरंग, गुरु और चेला, चिराग, फरिश्ता, श्रीमानजी यांसारख्या हिंदी चित्रपटांबरोबर श्रीमान बाळासाहेब, क्षण आला भाग्याचा, मानला तर देव या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.(Asha Nadkarni Death)