अभिनेत्री पूजा सावंत हिच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. याशिवाय आजवर तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनंही जिंकली. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अभिनेत्रीने महत्त्वपूर्ण काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी मनोरंजन सृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. पूजाच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजाने अगदी बॉलिवूड स्टाइलमध्ये शाही थाटामाटात लग्न केले. (Pooja Sawant)
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी पूजा तिच्या सोशल मीडियाद्वारेही चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. पूजा व सिद्धेशच्या लग्नाचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होताना पाहायला मिळाले. कुटुंबीय नातेवाईक व सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळी यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पूजा तिच्या लग्नानंतर संसारात रमलेली पाहायला मिळाली. चव्हाणांच्या घरी देखील पूजाच जोरदार स्वागत करण्यात आलेलं पाहायला मिळालं.

अशातच आता पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या पूजा तिच्या सासरच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. पूजाच्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो तिने शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये पूजाची आई, बहीणही पूजाच्या सासरी आलेले पाहायला मिळत आहेत. केक कट करत त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. पूजाने ही पोस्ट शेअर करत तिच्या नवऱ्याला म्हणजेच सिद्धेशला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.
पूजाचा नवरा हा मूळचा भारतातला असला तरी तो ऑस्ट्रेलियात कामानिमित्त राहतो. त्यामुळे पूजा लग्नानंतर बरेचदा तिच्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलिया येथे गेली असल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियातही पूजा बऱ्यापैकी रमलेली पाहायला मिळाली. त्यानंतर आता पूजा सध्या भारतात असून तिच्या सासरी रमलेली पाहायला मिळत आहे.