Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असतानाच काही दिवसांपूर्वी प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर तसेच तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. या पाठोपाठ सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचंही लग्न पार पडलं आहे. ही अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत. पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. मुंबईत पूजा सावंतचा लग्न सोहळा पार पडला आहे. पूजाच्या लग्नसोहळ्याला जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी व कलाकार मंडळींची उपस्थिती पहायला मिळाली.
अगदी शाही थाटमाट असलेल्या या पूजाच्या लग्नाच्या फोटोंनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. बऱ्याच दिवसांपासून पूजाच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो, व्हिडीओ समोर येत होते. साखरपुडा, संगीत, हळद, मेहंदी यांसारख्या कार्यक्रमाचं जोरदार सेलिब्रेशन ही पाहायला मिळालं. यानंतर आता अखेर पूजा सावंतचं लग्न झालं आहे. नववधूवराच्या या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी पूजाने पारंपरिक टचला मॉडर्न अंदाज दिलेला पाहायला मिळाला.
पूजाने लग्नासाठी भरजरी लाल रंगाची साडी परिधान केली होती. हातात हिरवा चुडा, गळ्यात पारंपरिक मंगळसूत्र आणि मोकळ्या केसात पूजाच सौंदर्य भरपूर खुलून आलं होतं, तर सिद्धेशने कुर्ता पायजमा व त्यावर नक्षीदार अशी शॉल परिधान केली होती. दोघांचाही हा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. लग्नसोहळा आटोपल्यानंतर पूजाने तिच्या नवऱ्यासाठी खास उखाणा देखील घेतला आणि त्यानंतर तिनं उपस्थितांचे आभार मानले. “सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सिद्धेश रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी!” असा सुंदर उखाणा पूजा सावंतने यावेळी घेतला. सौभाग्यवती झाल्यानंतर पूजाने उपस्थितांचे आभार मानत म्हटलं की, “माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानू इच्छिते की, वेळेत वेळ काढून, काम बाजूला ठेवून तुम्ही माझ्या या खास दिवसासाठी उपस्थिती लावली. मी खूप एन्जॉय केलं. आपण आपल्या लग्नाची, बायको होण्याची स्वप्न पाहत असतो, आणि आता लग्नाचे विधी सुरु होते तेव्हा मी एक-एक विधी एन्जॉय करत होते. माझ्या आयुष्यातील या अगदी अचूक माणसाच्या शोधासाठी मी इतकी वर्षे थांबले होते. सिद्धेश माझ्या आयुष्यात आलास त्याबद्दल तुझेही आभार.
यावर सिद्धेश स्वतःच मत मांडत म्हणाला, “हे सर्व जादुई होतं. एकूणच या उत्साह वाढवणाऱ्या ऊर्जेने सर्वकाही सुरळीत पार पडलं. आमच्या या शुभकार्याला उपस्थित राहत तुम्ही आशीर्वाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. सध्या सोशल मीडियावर पूजा व सिद्धेश याच लग्नाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. पूजाच्या लग्नात कलाकार मंडळींनीही भरपूर धमाल-मस्ती केलेला व्हिडीओ समोर आला आहे.