बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘राजकारणात रस नाही’, म्हणणाऱ्या सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, अजित पवारांच्या निधनानंतर घेतली शपथ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 31, 2026 | 5:06 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Sunetra Pawar Deputy CM

'राजकारणात रस नाही', म्हणणाऱ्या सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, अजित पवारांच्या निधनानंतर घेतली शपथ

Sunetra Pawar Deputy CM : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, अजित पवारांच्या निधनानंतर दोन दिवसांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अस्थी विसर्जन केल्यावर त्याच रात्रीत सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. आणि अखेर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. पतीच्या निधनाचे दुःख न कवटाळत त्यांनी जनतेच्या हिताचा विचार केला. त्यांच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा आणि सबंध जनतेचा विचार करुन त्यांनी दुःख विसरत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

“मला राजकारणात रस नाही…”, असं स्पष्ट सांगणाऱ्या सुनेत्रा अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. १९६३ मध्ये तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यात जन्मलेल्या सुनेत्रा यांनी ३८ वर्षांच्या अजित पवार यांच्याबरोबरील सहजीवनात राजकारणातील अनेक चढ उतार पाहिले आहेत. लोकसभेला स्वतः व मुलाचा पराभव पचवला आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्षात राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवार आज राज्यसभा खासदार असल्या तरी सामाजिक कामाचा शुभारंभ त्यांनी सासरी कोटेवाडीतून केला.

विधिमंडळाचा गटनेता पद म्हणून सुमित्रा पवार यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांच्यानंतर इथून पुढे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा असणार आहे.  सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल. यावेळी अजित पवार अमर रहे अमर रहेच्या घोषणा दिल्या गेल्या. यावेळी व्यासपिठावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी लोकभवन दरबार ‘अजित पवार अमर रहे’ च्या घोषणेने दुमदुमला.

Tags: ajit pawarpoliticsSunetra Pawar Deputy CM
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Priyadarshini Indalkar breakup

"आमचं रिलेशनशिपच टॉक्सिक झालं", प्रियदर्शिनी इंदलकर रिलेशनबाबत स्पष्टच बोलली, म्हणाली, "लवकर लग्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.