Priyadarshini Indalkar breakup : सध्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर व अभिजीत आमकर ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजित आमकर यांनी प्रणित मोरेच्या स्टॅन्डअप कॉमेडी शोला हजेरी लावली होती. यादरम्यान प्रणितने प्रियदर्शिनीला रिलेशनबाबत प्रश्न विचारले.
प्रियदर्शनीच्या अफेअरच्या चर्चांना यापूर्वी बरेचदा उधाण आलेलं पाहायला मिळालं. मात्र, आता ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटाच्या निमित्ताने तिने या अफेअरच्या चर्चांवर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
प्रणित मोरेच्या शोमध्ये चित्रपटाचं प्रमोशन करायला गेली असताना प्रणितने प्रियदर्शिनीची चांगलीच फिरकी घेतली. प्रणितने तिला विचारलं, “तू सिंगल आहेस का?”. त्यावर अभिनेत्री ‘हो’ म्हणाली. पुढे, प्रणितने तिला शेवटचं रिलेशन आणि ब्रेकअपबद्दल विचारलं. त्यावर प्रियदर्शिनीनं सांगितलं की, तिचं एप्रिल २०२५ मध्ये ब्रेकअप झालं होतं. पुढे ब्रेकअपचं कारण सांगत प्रियदर्शिनी म्हणाली की, “जुळलं नाही. आमच्यात कॉम्पॅटिबिलिटी नव्हती”. यावर प्रणितने तिला ‘रिलेशनशिप टॉक्सिक होतं का?’, असं विचारलं.
आणखी वाचा – हॉलिवूडला मोठा धक्का! ‘शिट्स क्रीक’ फेम अभिनेत्रीचे ७१व्या वर्षी निधन, तब्येत अचानक बिघडली आणि…
त्यावर प्रियदर्शिनी म्हणाली, “नाही… तो किंवा मी टॉक्सिक नव्हतो. पण आमचं रिलेशनशिपच टॉक्सिक झालं होतं”. ‘ब्रेकअपचा निर्णय कोणाचा होता?’ यावर प्रियदर्शिनी म्हणाली, “त्याला लवकर लग्न करायचं होतं. कारण तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि मला घाई नव्हती. यावरुन आमच्यात वाद सुरु झाले आणि मग त्यामुळे ते जमून आलं नाही”.
प्रणितने हाच संवाद पुढे नेत असं म्हटलं की, “तुला इन्स्टाग्रामवर लग्नासाठी विचारतात का?”. यावर प्रियदर्शिनी म्हणाली की, “मला मेल करतात. तीन-चार वर्षांपूर्वी ई-मेलवर एका माणसाने मला त्याचा बायोडाटा पाठवला होता. तो तेव्हा ३५ वर्षांचा होता आणि मी २४-२५ वर्षांची होते. त्यात त्याने घर या ठिकाणी आहे, प्रॉपर्टी आहे, लग्नानंतर आपण इथे राहू, लग्न कुठे होईल, नोकरी कोणती करतो, किती कमावतो असं त्याने बरंच काही सांगितलेलं”. अखेर प्रणित मोरेच्या शोमध्ये प्रियदर्शिनीने अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला.





