शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला त्याची गरज नाही”, सुप्रसिद्ध कवी व अभिनेत्याची कपिल शर्मावर आगपाखड, म्हणाले, “तो प्रसिद्ध नव्हता तेव्हा …”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2024 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
poet and actor Surendar Sharma commented on his argument with Kapil Sharma and not appearing on his show.

कवी व अभिनेते सुरेंद्र शर्मा यांना कपिल शर्माबरोबरच्या मतभेदाबद्दल आणि त्याच्या शोमध्ये न जाण्याबद्दल भाष्य

टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा’ हा कार्यक्रम अधिक लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमाने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यामधून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा अधिक प्रकाशझोतात आला. सध्या तो ओटीटीवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसून येत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार येण्यासाठी उत्सुक असतात. मात्र एका कवीने या शोमध्ये येण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे आणि ही कवी म्हणजे सुरेंद्र शर्मा. सुरेंद्र शर्मा हे कवी असण्याबरोबरच अभिनेतेही आहेत. अलीकडेच त्यांनी कॉमेडियन कपिल शर्माबद्दल भाष्य केले. (Surendar Sharma on Kapil Sharma)

सुरेंद्र शर्मा यांना कपिल शर्माबरोबरच्या मतभेदाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “जेव्हा कपिल प्रसिद्ध नव्हता तेव्हा त्याने माझ्याबरोबर अनेक शो केले आहेत. कपिल शर्माला हसवण्यासाठी काही लोकांची गरज आहे. मला त्याची गरज नाही. त्यांनी मला त्यांच्या शोसाठी बोलावले पण मी गेलो नाही. मी त्याला सांगितले की, तो इतका कमावत असला तरीही मला मोबदला हवा आहे”.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

आणखी वाचा – …अन् लेक पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांची हवाई सफर, खास फोटोही केला शेअर, नेटकऱ्यांसह कलाकारांनीही केलं कौतुक

यापुढे ते म्हणाले की, “कपिल शर्मा शोमध्ये येण्याने माझी लोकप्रियता वाढेल असे त्याने मला सांगितले आणि मी तसे करण्यास नकार दिला. शोच्या निर्मात्यांनीही माझ्याशी संपर्क साधला होता. पण मी गेलो नाही. कपिलला कॉमेडी येत नाही असे मी म्हणत नाही, पण त्याचा अभिनय टिकवून ठेवण्यासाठी त्याला काही ३-४ लोकांच्या पाठिंब्याची गरज असते. जेणेकरून तो त्यांच्याबद्दल बोलू शकेल. पण कॉमेडीसाठी तो एकटा उभा राहू शकत नाही, हे माझं म्हणणं आहे”.

आणखी वाचा –

दरम्यान, सुरेंद्र शर्मा यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.  ‘करम’ आणि ‘पट्टन की बाजी’ यांसारखे हे त्यांचे काही प्रसिद्ध हिंदी चित्रपट आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटके लिहिली आहेत जी आजही संस्मरणीय आहेत. त्यांनी केवळ नाटके लिहिली नाहीत तर त्यात अभिनयही केला आहे. तसंच ते त्यांच्या अनोख्या विनोद शैलीसाठी आणि कवितांसाठी ओळखले जातात.  

Tags: Surendar Sharma on Kapil Sharmasurender sharmasurrender sharma kapil sharma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aai kuthe kay karte serial fame actress Kaumudi Walokar pre-wedding rituals started and she shared a special photo on social media.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, विधींना सुरुवात, ग्रहमखचे फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.