रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्लिज डॉक्टर पाठवा”, ‘मिशन राशन’ टास्कमध्ये दिव्या शिंदे बेशुद्ध पडली आणि स्पर्धकांची झाली तारांबळ

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 13, 2026 | 10:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Update

'मिशन राशन' टास्कमध्ये दिव्या शिंदे बेशुद्ध

Bigg Boss Marathi Update : ‘बिग बॉस’ मराठी सीझन ६चा नवा प्रोमो समोर आला आहे, या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांसाठी ‘मिशन राशन’ हा महत्त्वाचा टास्क दिला आहे, संपूर्ण आठवड्याचं राशन मिळवण्यासाठी स्पर्धकांना हा टास्क पूर्ण करावा लागणार आहे. प्रोमोमध्ये ‘मेहनतीचा दरवाजा’ निवडून घरात एंट्री घेतलेले काही सदस्य या टास्कमध्ये काम करताना दिसतात. काही स्पर्धक स्टोअर रूममधून मोठ्या प्रमाणात भांडी बाहेर काढताना दिसत आहेत, तर काही सदस्य ती भांडी व्यवस्थित लावण्याचं काम करत आहेत. दरम्यान, प्रभू शेळके स्विमिंग पूलमधून पाणी काढताना झटताना दिसतो.

भांड्यांचा ढीग पाहून अनेक स्पर्धक हैराण झाल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होतं. भांडी उचलताना दिव्या शिंदे संतापात म्हणते, “अख्ख्या जिल्ह्याची भांडी दिलीत का घासायला?” मात्र, हा टास्क पुढे जात असतानाच वातावरण अचानक गंभीर होतं. प्रोमोच्या शेवटी दिव्या शिंदे दमून गार्डनमध्ये बेशुद्ध पडल्याचं पाहायला मिळतं. हे दृश्य पाहून घरातील एक स्पर्धक घाबरत “प्लीज… डॉक्टर पाठवा बिग बॉस,” अशी विनंती करताना ऐकू येतो. ‘मिशन राशन’ टास्कदरम्यान दिव्या शिंदेची प्रकृती बिघडल्याचे स्पष्ट संकेत या प्रोमोमधून मिळत आहेत. (Bigg Boss Marathi Update)

आणखी वाचा – “बिनडोक, तुझं तोंड…”; पहिल्याच दिवशी तन्वी आणि रुचितामध्ये वाद, रुचिताचं तन्वीला सडेतोड उत्तर, नेमकं काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसऱ्याच दिवशी बिग बॉसच्या घरात डॉक्टर येणार का? दिव्या शिंदेला नेमकं काय झालं आहे? आणि या घटनेनंतर उर्वरित स्पर्धक हा टास्क पूर्ण करणार की तो रद्द केला जाणार? दरम्यान, या प्रोमोवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी दिव्या शिंदेच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत तिला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी मात्र ‘मेहनतीचा दरवाजा’ स्वतः निवडून नंतर बेशुद्ध पडल्यामुळे तिला ट्रोल केलं आहे.एकूणच ‘मिशन राशन’ टास्कमुळे बिग बॉस मराठी ६ मध्ये पहिल्याच आठवड्यात मोठा ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Bigg Boss Marathi Update)

आणखी वाचा – ‘बिग बॉस’चं घर स्पर्धकांसाठी बंद! पहिल्याच दिवशी घरामध्ये तुफान, नेमकं काय घडलं?

Tags: Bigg Boss Marathi Updateentertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
bigg boss marathi 6 updates

"पहिला कोंबडा भेटला", काळू डॉन जमिनीवरच झोपला आणि कोंबडा आरवताच…; यावर सागर कारंडेने असं केलं की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.