मनोरंजन विश्वातील बरीच कलाकार मंडळी अशी आहेत जी त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबाला म्हणा वा स्वतःला वेळ देत फिरायला जातात. बरेच कलाकार त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी ट्रिपला गेलेले पाहायला मिळाले आहेत. सोशल मीडियावरुन ही मंडळी ट्रिप एन्जॉय करतानाचे अनेक व्हिडीओ, फोटोही शेअर करत असतात. अशातच सध्या एक ज्येष्ठ अभिनेत्री तिच्या कुटुंबाबाबरोबर गोवा येथे एन्जॉय करताना दिसत आहे. (Vandana Gupte Enjoying Goa)
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या सध्या त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत गोवा येथे सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. गोव्यातील खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांसह ही गोष्ट शेअर केली. आजवर सिनेसृष्टीत सहज व योग्य टायमिंगमुळे वंदना गुप्ते यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तसेच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कामाविषयी व वैयक्तिक आयुष्याविषयी बऱ्याच अपडेट त्यांच्या चाहत्यांना देत असतात.
अशातच त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या गोव्यातील एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. वंदना त्यांच्या कुटुंबाबरोबर गोवा येथे एन्जॉय करत आहेत. गोव्यात एन्जॉय करतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यावेळी त्या त्यांच्या नातवाबरोबर गोवा येथे गेल्या आहेत. व्हिडीओ शेअर करत त्यांनी गोव्याच्या अथांग समुद्राची झलक दाखविली. शिवाय गोव्यात येऊन किती छान वाटतंय याबद्दलही त्या बोलल्या. व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या नातवाचीही ओळख करून दिली. इतकंच नव्हे तर वंदना यांच्या नातवाने आजीच्या येणाऱ्या चित्रपटाचं प्रमोशन करायलाही सुरुवात केली.
वंदना या त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूप एन्जॉय करत असतात. नेहमीच त्या अनेक ठिकाणी फिरायलाही जात असतात. काही दिवसांपूर्वी त्या परदेश दौरा करुन आल्या आहेत. सोशल मीडियावरुन त्या नेहमीच एन्जॉय करतानाचे अनेक फोटो शेअर करत असतात. जशा त्या खऱ्या आयुष्यात धमाल मस्ती करणाऱ्या आहेत तशाच त्या पडद्यावरही धमाल करत चित्रीकरण करत असतात.