Raghav Parineeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. आज २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या विवाहसोहळा उदयपूरमध्ये थाटामाटात पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे दिल्लीतील विधी आटोपून हे दोघं कुटुंबासह उदयपूरयेथे पोहोचले आहेत. लग्नाची तयारीही पूर्ण झाली असून लग्नापूर्वीच्या विधी व समारंभांना मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. काल शनिवार रोजी परिणीती व राघव यांचा हळदी समारंभ उरकला. तर पंजाबी गाण्यांवर संगीताची मैफिल रंगली.
परिणीती व राघव यांच्या लग्नसोहळ्याला पाहुण्यांची रेलचेलही सुरु झाली आहे. काहींनी हॉटेलचे फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. पाहुणे मंडळींनी लग्नसोहळा होणाऱ्या पॅलेसचे फोटोस सोशल मीडियावर अपलोड करायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे ती परिणीती व राघव यांच्या हळदी व संगीत समारंभाच्या लूकची. आता मात्र प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, परिणीती व राघव यांचा हळदी सोहळा थाटामाटात व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत पार पडला असल्याचं समोर आलं आहे. शिवाय संगीत सोहळा ही दणक्यात साजरा झाला असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीतीने स्वतः राघव यांच्यासाठी स्वतः लिहिलेली कविता या कार्यक्रमादरम्यान सादर केली असल्याचं समोर आलं.
भव्य दिव्य महलात परिणीती व राघव यांचा सोहळ्यादरम्यानचा लुक व्हायरल झाला आहे. या जोडप्याच्या लग्न समारंभादरम्यान संबंधित फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहोत. रागनीतीचे संगीत फंक्शनमधील फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये परिणीती सिल्वर रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तर, काळ्या पोशाखात राघव चड्ढाचा हँडसम लूक पाहायला मिळतोय. राघव चढ्ढा व परिणीती चोप्रा यांच्या संगीताशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान प्रसिद्ध पंजाबी गायक हंस राज याच्या सुरांवर मंत्रमुग्ध होऊन नाचताना दिसत आहेत.