सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करेन”, लग्नाच्या वाढदिवसादिवशी शेफाली जरीवालाच्या पतीला येतेय आठवण, भावुक होत म्हणाला, “माझ्याशी लग्न…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 12, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala-Parag Tyagi Wedding Anniversary

"शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करेन", लग्नाच्या वाढदिवसादिवशी शेफाली जरीवालाच्या पतीला येतेय आठवण, भावुक होत म्हणाला, "माझ्याशी लग्न…"

Shefali Jariwala-Parag Tyagi Wedding Anniversary : टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे २७ जून रोजी निधन झाले. अभिनेत्रीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ती मृत्युमुखी पडली. या बातमीने संपूर्ण सिनेविश्व हादरलं. अवघ्या वयाच्या ४२ व्या वर्षी शेफालीला अँटी एजिंगच्या गोळ्या घेतल्याने हा त्रास झाला आणि यामुळे तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं. चाहत्यांमध्येही या दुःखद बातमीने नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला. शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीचा नवरा पराग त्यागी एकटा पडला आहे, परंतु अभिनेत्रीबद्दलचे त्याच्या हृदयात असणारे प्रेम काही कमी झाले नाही. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने पुन्हा एकदा शेफालीची आठवण काढली आहे.

पराग आणि शेफाली हे दोघेही १२ ऑगस्ट रोजी एकमेकांना भेटले आणि त्यांनी याच दिवशी एकमेकांची भेट घेतली आणि त्यांनी याच दिवशी लग्न केले. हा दिवस आठवत असताना, परागने आपल्या दिवंगत पत्नी शेफालीसाठी एक विशेष नोट आणि व्हिडीओ शेअर केला. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने लिहिले, “माझे प्रेम, माझे आयुष्य, माझी परी. जेव्हा मी १५ वर्षांपूर्वी प्रथमच तुला पाहिले तेव्हा मला माहित होते की आपण एकटे आहात आणि ११ वर्षांपूर्वी आपण ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी तू माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आयुष्यात येऊन मला बिनशर्त प्रेम देण्याबद्दल मी खूप आभारी आहे, मात्र याचा मला कदाचित हक्क नव्हता”.

आणखी वाचा – “लग्नानंतर मंगळसूत्र नाहीच घातलं तर…?”, सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी काय म्हणाली, “माझ्यासाठी परंपरेपेक्षा…”

View this post on Instagram

A post shared by Pari aur Simba ke Papa (@paragtyagi)

परागने पुढे लिहिले आहे की, “तुम्ही माझे आयुष्य इतके सुंदर आणि रंगीबेरंगी केले, मला उघडपणे जगण्यास शिकवले आणि आता मी ते छान क्षण आठवणींच्या रुपात जपत आहे. परी, शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही मी तुमच्या प्रेमात राहील. १२ ऑगस्ट, २०१० पासून अनंतकाळपर्यंत. नेहमी एकत्र”. पराग त्यागी नेहमीच सोशल मीडियाद्वारे आपल्या पत्नीची आठवण शेअर करत असतो. व्हिडीओ आणि फोटोद्वारे तो एकमेकांबरोबर घालवलेल्या विशेष क्षणांच्या आठवणी शेअर करताना दिसतो. यापूर्वी, पराग त्यागीने त्याच्या वाढदिवशी तिच्या आईला शुभेच्छा देत शेफालीबरोबरचे काही फोटोही पोस्ट केले होते.

आणखी वाचा – यकृताचा आजार, आर्थिक तंगी आणि…; धनुषबरोबर पदार्पण करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची वाईट अवस्था, सरकारी मेसच्या जेवणावर…

रक्षाबंधनच्या दिवशी परागने शेफालीच्या नावे घरच्या मदतनीसला राखी बांधली. त्याची दिवंगत पत्नी शेफाली यांनी ही परंपरा सुरु केली. हे लक्षात घेऊन, परागने घरगुती सहाय्यक आणि पाळीव प्राणी कुत्रा सिम्बा यांना राखी बांधली. त्याने सांगितले की शेफाली यापुढे त्यांच्याबरोबर नसली तरी ती ही परंपरा कायम ठेवेल.

Tags: bollywood newsentertainmentShefali Jariwala-Parag Tyagi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Rupali Ganguly Accused

रुपाली गांगुलीवर मांसाहार खाण्याचे आरोप, 'अनुपमा' फेम अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, "भटक्या आणि बेघर कुत्र्यांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.