शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पंकज उधास यांना शेवटचं पाहताना पत्नीची वाईट अवस्था, मुलींनी धरुन आणलं अन्…; कुटुंबियांची परिस्थिती पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 27, 2024 | 4:05 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Pankaj Udhas wife and daughters entered the crematorium to pay their last rites

Video : पंकज उधास यांना शेवटचं पाहताना पत्नीची वाईट अवस्था, मुलींनी धरुन आणलं अन्...; कुटुंबियांची परिस्थिती पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर

ज्येष्ठ गायक व गझलकार पंकज उधास यांनी काल वयाच्या ७२व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने संगीत क्षेत्रासह सर्वच स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. पंकज उधास यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अंतिमसंस्काराबाबतची माहिती शेअर केली. मुंबईमधील वरळीतील स्मशानभूमीमध्ये पंकज उधास यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

पंकज उधास यांची मुलगी नायाबने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर कारट त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये “खूप जड अंतःकरणाने आम्ही सांगत आहोत की, पद्मश्री पंकज उधास यांचे दीर्घ आजारपणामुळे काल (२६ फेब्रुवारी २०२४) रोजी निधन झाले असून आज मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ३ ते ५ या वेळेत त्यांच्यावर वरळीमधील हिंदू स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार केले जाणार आहेत” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – प्रसिद्ध गझलकार पंकज उधास यांना आज अखेरचा निरोप, राहत्या घरी पार्थिव आणल्यानंतर गर्दी, लेकही पोहोचली अन्…

अशातच पंकज उधास यांचे पार्थिव स्मशानभूमीमध्ये दाखल झाले असून त्यांचे संपूर्ण कुटुंबही पंकज उधास यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी स्मशानभुमीमध्य दाखल झाले आहे. सोशल मीडियाव एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये पंकज उधास यांच्या दोन लेकी त्यांच्या आईसह पंकज उधास यांना शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर पंकज उधास यांचे अनेक कुटुंबीय व जवळचे काही नातलगही त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी स्मशानभूमीमध्ये पोहोचले आहेत.

आणखी वाचा – धक्कादायक! भीषण रस्ते अपघातात ‘पंचायत’ फेम अभिनेत्रीने गमावला जीव, चार भोजपूरी कलाकारांचाही समावेश, एकूण नऊ जणांचा मृत्यू अन्…

दरम्यान, पंकज उधास यांच्या निधनानंतर मनोरंजन, राजकीय, तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी  त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली होती. तसेच या व्हिडीओखालीही अनेकांनी पंकज उधास यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर पंकज उधास यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबाला या परिस्थितीत खंबीर राहण्यास व धीर दिला आहे.

Tags: Ghazal Singer Pankaj Udhas Death News in MarathiMusic Legend Pankaj Udhas CareerMusic Legend Pankaj Udhas FamilyMusic legend Pankaj Udhas passes awayMusic Legend Pankaj Udhas Songs Marathi NewsPankaj UdhasPankaj Udhas death Marathi NewsPankaj Udhas diedPankaj Udhas died at 72Pankaj Udhas Latest Marathi Newsगझल गायक पंकज उधास मृत्यूगझल गायक पंकज उधास यांचे ७२ व्या वर्षी निधनपंकज उधासपंकज उधास ताज्या मराठी बातम्यापंकज उधास मृत्यू मराठी बातम्यापंकज उधास यांचे निधनसंगीत दिग्गज पंकज उधास यांचे निधन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Pooja Sawant Siddhesh Chavan Haladi Ceremony

Video : पूजा सावंतचा हळदीत 'बुमरो'वर भन्नाट डान्स, बहिणीला घेऊनही मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.