मालिकांच्या लोकप्रियतेच्या यादीत सध्या भाग्य दिले तू मला ही मालिका अव्वल स्थानावर आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत पाहायला मिळतंय की, कावेरीचा अपघात झाल्याने तिचा स्मृतिभ्रंश झालेला असतो. त्यामुळे राजला ही खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशातच मालिकेतील रत्नमाला मोहिते म्हणजे निवेदिता सराफ यांनी काही दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. (Bhagya Dile Tu Mala)
आता मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. प्रोमोमध्ये निवेदिता सराफ म्हणजेच रत्नमाला मोहिते परत आलेल्या दिसत आहेत. हॉलमध्ये रत्नमाला मोहिते बसलेल्या असतात तेव्हा कावेरी फाईल घेऊन सही साठी रत्नमाला यांच्या जवळ येते, आणि रत्नमाला यांना मॅडम, तुमची argent सही हवी होती असं म्हणते.(bhagya dile tu mala promo)
निवेदिता यांचं मोठं पाऊल(Nivedita saraf)
हे ऐकून रत्नमाला यांना धक्काच बसतो, त्या कावेरीला काही बोलणार इतक्यात राज त्यांना अडवतो आणि सांगतो की, कावेरीच्या अपघात झाला होता त्यात तिची स्मृती गेली. त्यांना मागील सहा महिन्यात काय घडलं हे नाही आठवत आहे. यावर रत्नमाला राजला धीर देत म्हणत आहेत की, काळजी नको करुस राज आता मी पाहाते कावेरीची स्मृती कशी परत येईल ते.
आता राज कावेरी मध्ये आलेला दुरावा रत्नमाला कसा दूर करणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल