Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्यची तब्येत आणखीनच खालावलेली असते. अहिल्यादेवी, पारुला हे सगळं काही पाहवत नाही. पारू स्वतःला दोष देत मंगळसूत्र काढल्यामुळे हे सगळं घडलं असल्याचं मनातल्या मनात म्हणते आणि ती मध्येच उठून मंदिराजवळील झाडाजवळ येते. झाडाजवळ येताच पारू पाहते तर तिथे तिला मंगळसूत्र काही दिसत नाही म्हणून ती घाबरते त्यानंतर तिला झाडाच्या मुळाशी मंगळसूत्र दिसतं ते पाहून ती खुश होते आणि ते मंगळसूत्र घेऊन ती घालायला जाते. इतक्यात एक साधू तिला थांबवतात आणि सांगतात की, “थांब पोरी एकदा का हा धागा गळ्यात ना काढून टाकलास तर आता तुला याची परीक्षा द्यावी लागेल.
इतका सहजासहजी तू हा आता धागा गळ्यात बांधू शकत नाही. सौभाग्याचं लेणं याला म्हणतात” तर यावर पारू सांगते की, “पण माझ्या सौभाग्याचा जीव धोक्यात आहे. हे ऐकल्यावर ते साधू म्हणतात, “एकदा हा धागा काढलास म्हणजे तुझं सौभाग्याशी संबंध तुटला. आता तुला जर हे सगळं पुन्हा हवं असेल तर तुला खूप मोठी सत्वपरीक्षा द्यावी लागेल”. यावर पारू सांगते की, “मी आदित्य सरांसाठी काहीही करायला तयार आहे”. त्यानंतर ते साधू सांगतात की, “तुला निर्जळी उपवास करुन एक परीक्षा द्यावी लागेल तर ही सत्वपरीक्षा फक्त तुझी नसून एका आईचीसुद्धा आहे. या सगळ्याची नाळ आईशी जोडली आहे. त्यामुळे त्या आईला सुद्धा सर्व वैभव विसरुन घरोघरी जाऊन भिका मागून एका गरजूला ते अन्न खायला घालावे लागेल”, हे ऐकल्यावर पारूला खूप टेन्शन येतं की आता हे सगळं अहिल्या देवींना कसं सांगायचं.
आणखी वाचा – Bigg Boss Ott ची विनर ठरली सना मकबूल, ट्रॉफीसह मिळाली तब्बल इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव
त्याच वेळेला साधू पारूजवळ एक अंगारा देतात आणि सांगतात की, “हा तुझ्या नवऱ्याला लाव त्याला बरं वाटेल”. त्यानंतर ते साधू तिथून गायब होतात. त्यानंतर पारू धावत धावत हॉस्पिटलमध्ये येते. तेव्हा दिशा तिला अडवते आणि सांगते की, तुला आत जाण्याची परवानगी नाही आहे. त्यावर पारू तिला सगळं काही सांगते मात्र दिशा म्हणते की, या फालतू गोष्टींवर आमचा विश्वास नाही आहे आणि तू हे सगळं सासू मॉमला करायला सांगायचंसुद्धा नाही. हे ऐकल्यावर प्रिया तिला सांगते की, “पारू तू कोणाचाही विचार न करता आतमध्ये जाऊन अंगारा लावून ये.
त्यानंतर पारू आतमध्ये जाते आणि अंगारा लावून येते. तिला आदित्यला पाहून रडू कोसळतं. हे सगळं माझ्यामुळे झाले त्यामुळे मी हे सगळं काही नीट करेल असं म्हणत आदित्यला ती अंगारा लावून बाहेर येते. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, दिशाने काही लोकांना आदित्यला जीवे मारण्यासाठी पैसे दिलेले असतात. तर इकडे अहिल्यादेवी आदित्यला बरं वाटावं म्हणून उपवास करत देवाकडे मागण मागतात. तर दिशाच्या सांगण्यावरुन एक माणूस इंजेक्शनमध्ये काहीतरी औषध मिसळून येतो. अहिल्यादेवी आदित्यसाठी कोणतीही सत्व परीक्षा द्यायला तयार असल्याचे म्हणतात. आता पारू अहिल्यादेवींना या अग्निपरीक्षेबद्दल सांगेल का?, हे सगळं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.