शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदित्यबरोबरच्या लग्नाचं सत्य सावित्रीला कळालं, तर अहिल्यादेवी पारूवर नाराज, माफी मागताच निघूनही गेल्या अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 23, 2024 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

आदित्यबरोबरच्या लग्नाचं सत्य सावित्रीला कळालं, तर अहिल्यादेवी पारूवर नाराज, माफी मागताच निघूनही गेल्या अन्…

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रीतम त्या गावाकडच्या मुलीचा फोटो पाहत असतो तितक्यात तिथं आदित्य येतो आणि तो फोटो पाहून त्याला चांगलाच दम भरतो. मात्र प्रीतम त्यावेळी तो फोटो पारूच्या मैत्रिणीचा असल्याचं सांगत बाजू सांभाळून घेतो. तर इकडे पारू तिच्या हाताला भाजलेले असतानाही किचनमध्ये भांडी आवरत असते ते पाहून सावित्री आत्या पारूला खूप ओरडतात आणि सांगतात की अजून तू तुझ्या हाताला मलमही लावलेला नाही आहेस. तू आधी घरी चल असं म्हणून तिला घरी घेऊन येतात. तर अहिल्यादेवी श्रीकांतशी बोलत असतात तेव्हा म्हणतात की, आज पारूमुळे माझी वटपौर्णिमेची पूजा अगदी योग्यरीत्या संपन्न झाली. आजही पारूचं माझ्या मदतीला धावून आली आणि घडला प्रकार त्या श्रीकांतला संगतात. तेव्हा श्रीकांतही पारूचं कौतुक करतो आणि तेव्हा अहिल्यादेवी नाराजी व्यक्त करतात की, तिला हाताला भाजलं असून ती दिवसभर काम करत आहे हे माझ्या लक्षातही आलं नाही. (Paaru Serial Update)

त्यानंतर जेव्हा सावित्री आत्या पारुला घेऊन घरी येतात तेव्हा घरी मलम संपलेलं असतं म्हणून मारुती व गणी ते मलम आणायला बंगल्याबाहेर पडतात. त्यावेळेला सावित्री आत्या पारूला झोपून आराम करायला सांगतात. तितक्यातच पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र सावित्री आत्याच्या नजरेस पडतं. सावित्री आत्या पारूला म्हणतात की, हे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुठून आलं?, त्यानंतर त्या स्वतःच तू हरीशसाठी आज वडाची पूजा केलीस ना?, त्याच्या ताटातलं उष्ट अन्न खाल्लस ना?, असं विचारतात. यावर पारू ढसाढसा रडू लागते आणि ती काहीच बोलत नाही. ऍडशूटमधील हरीश सरांबरोबरचं लग्न तू खरं मानलं असंही त्या म्हणतात. त्यानंतर सावित्री आत्या पारूला आराम करायला सांगतात आणि तिथून निघून जात असतात. तितक्यात पारू त्यांना थांबायला सांगते आणि म्हणते की, हे मी हरिश सरांसाठी केलं नाही. वडाची पूजा त्यांच्यासाठी केली नाही आणि त्यांच्या ताटातलं उष्ट अन्नही खाल्लेलं नाही तर त्यावर सावित्री आत्या म्हणतात, मग तू सगळं कोणासाठी केलं आणि हे मंगळसूत्र कोणाचा आहे?, तू रोज या मंगळसूत्राची पूजा करतेस, हे नक्की कोणाचा आहे?, असा तिला सवाल करतात.

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर यांचे आई-बाबाच बघत नाहीत ‘सातव्या मुलीची…’ मालिका, स्वत:च म्हणाल्या, “आक्रमक, विकृत…”

त्यावर पारू हे मंगळसूत्र आदित्य सरांच्या नावाचं आहे. त्या ऍड शूटवेळी हरीश सरांबरोबर नव्हे तर आदित्य सरांबरोबर माझं लग्न झालं आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे हे लग्न मी खरं मानलं आहे. त्यामुळे मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र हे मरेपर्यंत काढणार नाही. हे ऐकल्यावर सावित्री आत्याला खूपच राग येतो. सावित्री आत्या म्हणतात हे लग्न खरं मानून तुला स्वतःचं आयुष्य उध्वस्त करुन घ्यायचं आहे का?, असं म्हणत तिच्यावर हात उगारतात मात्र तितक्यातच त्या थांबतात. तेव्हा पारू म्हणते की मारा मला. माझी आई असती तर मला सुद्धा तिने असंच मारलं असतं. माझी चूक आहे मला सगळेजण स्वार्थी म्हणतील. आदित्य सरांच्या पैशासाठी हे सगळं केलं असल्याचंही म्हणतील पण किती झालं तरी मी किर्लोस्कर घराण्याची सून आहे आणि मी माझं कर्तव्य निभावणार.

आणखी वाचा – लग्नानंतर धर्म बदलणार नाही सोनाक्षी सिन्हा, होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले, “हिंदू किंवा मुसलमान…”

तर मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दामिनी अहिल्यादेवीना काही तरी सांगते तर दुसऱ्या दिवशी पारू अचानक येऊन अहिल्यादेवींच्या पायावर डोकं ठेवते. मात्र अहिल्या देवी तिथून उठून सरळ निघून जातात. आता अहिल्यादेवींना नेमका कशाचा राग आला असणार?, दामिनीने असं त्यांना काय सांगितलं?, हे सगळं मालिकेच्या आगामी भागात पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: entertainment newsmarathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Nana Patekar Emotional Incident

"मी त्याचा खूप तिरस्कार करायचो कारण…", मोठ्या मुलाच्या निधनाबाबत नाना पाटेकरांचं भाष्य, म्हणाले, "तो अडीच वर्ष…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.