शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी त्याचा खूप तिरस्कार करायचो कारण…”, मोठ्या मुलाच्या निधनाबाबत नाना पाटेकरांचं भाष्य, म्हणाले, “तो अडीच वर्ष…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 23, 2024 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nana Patekar Emotional Incident

"मी त्याचा खूप तिरस्कार करायचो कारण…", मोठ्या मुलाच्या निधनाबाबत नाना पाटेकरांचं भाष्य, म्हणाले, "तो अडीच वर्ष…"

बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. न पटणाऱ्या अशा मुद्द्यांवर ते खुलेपणाने आपले मत मांडताना दिसतात. मात्र ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमीवेळा बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मोठ्या मुलाच्या मृत्यूबद्दल खुलेपणाने भाष्य केलं. मोठ्या लेकाच्या निधनाचे कारणही त्यांनी सांगितले आणि हे सांगताना ते भावूक झालो. नाना पाटेकर यांनी सांगितले की, “त्यांचा मोठा मुलगा हा जन्मापासून कसा अडचणीत होता आणि त्यामुळेच त्याला आपला जीव गमवावा लागला”. (Nana Patekar Emotional Incident)

नाना पाटेकर यांनी ‘द ललनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील या कठीण काळाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “माझ्या मोठ्या मुलाला एका डोळ्याची समस्या होती. त्याला दिसत नव्हते. मी त्याचा इतका तिरस्कार करु लागलो की, जेव्हा मी त्याला बघितले तेव्हा मला प्रश्न पडला की नानांचा हा असा कसा मुलगा आहे. याबद्दल लोक काय विचार करतील. त्याला काय वाटले किंवा कसे वाटले याचा मी विचार केला नाही. मी फक्त माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचा विचार केला. त्याचे नाव दुर्वासा ठेवले होते. त्याने आमच्याबरोबर अडीच वर्षे घालवली पण तुम्ही काय करु शकता. आयुष्यात काही गोष्टी निश्चित असतात”.

आणखी वाचा – आदित्यबरोबरच्या लग्नाचं सत्य सावित्रीला कळालं, तर अहिल्यादेवी पारूवर नाराज, माफी मागताच निघूनही गेल्या अन्…

नाना पाटेकर यांनी आपल्या मुलाचे नाव नेहमी संतप्त ऋषी दुर्वासा यांच्या नावावरुन ठेवल्याचा खुलासा केला. त्यांची पत्नी नीलकांतीशी कशी भेट झाली हेही सांगितले. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्यांची भेट एका नाटकादरम्यान झाली होती. ती बँक ऑफिसर होती. तिला अडीच हजार रुपये पगार होता. नीलकांतीने नानांना सांगितलं होतं की, नाटक वगैरे करायचं असेल तर करु शकतो कारण तिथूनही पैसे कसेही येतील.

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर यांचे आई-बाबाच बघत नाहीत ‘सातव्या मुलीची…’ मालिका, स्वत:च म्हणाल्या, “आक्रमक, विकृत…”

नाना पाटेकर यांनी सांगितले की, त्यांच्या बहिणीमुळे त्यांनी सिगारेट पिणे सोडले होते. ते म्हणाले, “माझ्या बहिणीमुळेच मी धूम्रपान सोडले. त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा यामुळेच गमावला होता. त्यावेळी मी दिवसाला सुमारे ६० सिगारेट ओढत असे. अंघोळ करतानाही मी सिगारेट ओढायचो. पण हे खूप वाईट आहे. वासामुळे माझ्या गाडीत कोणी बसत नव्हते. मी कधीच दारू प्यायलो नाही पण खूप धुम्रपान केले. माझ्या बहिणीने मला धूम्रपान केल्यानंतर खोकत असताना पाहिले. आणि ती म्हणाली, “अजून काय बघायचं आहे?”, हे ऐकून नाना पाटेकरांना खूप वाईट वाटले. आणि त्या दिवसापासून त्यांनी धूम्रपान सोडले.

Tags: nana patekarnana patekar eder son passed awayNana Patekar Emotional Incidentnana patekar family
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Jui Gadkari Video

काका-पुतणीची जुगलबंदी! जुई गडकरीने शेअर केला खास मैफिलीचा व्हिडीओ, कुटुंबासह एन्जॉय करताना दिसली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.