‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, वाखरवाडीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर इकडे गणी आणि प्रीतम गावातल्या मुलांबरोबर कैऱ्या तोडायला म्हणून शेतावर जात असतात. त्यावेळेला दिशाही त्यांच्यामागून येते. मात्र प्रीतम काही दिशाला भाव देत नाही तेव्हा दिशा प्रीतमला निचा दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला डीवचण्याचा प्रयत्न करते मात्र प्रीतम तिचं बोलणं मनाला लावून न घेता तिलाच उलट बोलतो, त्यानंतर दिशा प्रीतमच्या मागून मागून जात असतानाच दीक्षाचा पाय शेणात बुडतो, त्यावेळेला सगळेच गावातली मुलं हसू लागतात दिशाला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं, तेव्हा प्रीतम सांगतो तू इथेच थांब. मी तुझ्यासाठी पाय धुवायला पाणी घेऊन येतो. तेव्हा दिशा तिथेच थांबते मात्र प्रीतम तिथून निघून शेतात गेलेला असतो. (Paaru Serial Update)
तर इकडे पारू आणि आदित्य बोलत असतात तेव्हा आदित्य पारुला लग्नाबद्दल सांगतो तेव्हा पारू सांगते की, तुम्ही माझ्याशी या विषयावर बोलणार असाल तर मला आता काहीच बोलायचं नाही आहे आणि असं म्हणत चिडत ती तिथून निघून जाते. त्यानंतर पारूला आदित्य म्हणतो ठीक आहे. मी या विषयावर बोलणार नाही पण तुला नेमका कसा मुलगा हवा आहे ते तरी मला सांगशील का?, यावर पारू खूप सुंदर अशा शब्दात तिला हवा असणाऱ्या मुलाचं वर्णन करते. तेव्हा आदित्य म्हणतो की, तू तुझ्या प्रेमाचे दरवाजे उघडे कर म्हणजे तुला आजूबाजूला अशी माणसं असल्याचा नक्कीच भास होईल त्यानंतर इकडे प्रीतम शेतावर कैऱ्या तोडायला जातो आणि कैऱ्या तोडून मुलांना देतो तितक्यात शेतमालक तिथे येतो आणि गावातल्या एक टीचरही येतात, त्यांना पाहून प्रीतम त्यांच्या प्रेमातच पडतो. त्या टीचर त्या मुलांसकट आंबे चोरले आणि नुकसान केलं म्हणून प्रीतमला ही ओरडतात. मात्र प्रीतम त्या टीचरच्या प्रेमात इतका बेधुंद झालेला असतो की त्याला काहीच कळत नाही. त्यानंतर पारू आणि सगळेजण मुंबईला जायला निघतात तेव्हा हरीश व आदित्य तिची मदत करतात तेव्हा पारूच्या लक्षात येतं की प्रीतम आणि गणी इथे नाही आहेत.
दिशाही म्हणते की, प्रीतम माझ्याबरोबर नव्हता. तो कुठे आहे मला माहित नाही. तेव्हा गणी व प्रीतमला पारू व आदित्य शोधायला गावात जातात. तर इकडे प्रीतम शाळेत पोहोचलेला असतो शाळेत त्या टीचर शिकवत असतात तेव्हा त्यांना तो बाहेरूनच बघतो. तेव्हा टीचरला कळतं की प्रीतम इथे आलेला आहे तेव्हा त्या बाहेर येतात आणि विचारतात की कोण आहे इकडे काय काम आहे तुमचं?, त्या वेळेला प्रीतम खोटं सांगतो की गणी त्याचा मुलगा असल्याचा खोटं सांगत त्याला इथे शिकायला शाळेत पाठवायचा आहे तो वाया गेला आहे, आईविना पोर आहे, असं सगळं काही नाटक करत सांगतो. ते मात्र त्या टीचर ओळखून असतात त्यानंतर तितक्यात पारू येते, पारू म्हणते की, तुम्ही अजून इथे काय करताय. चला आपल्याला मुंबईला निघायचे आहे, हे ऐकल्यानंतर तर टीचर अजूनच अवाक होतात आणि म्हणतात ही, तुमची मुलगी आहे का?, त्यानंतर प्रीतम शाळेतल्या बाईंकडे गणीच्या शिक्षणासाठी नंबर मागतो. मात्र त्या काही देत नाही. तेव्हा शाळेतल्या मुलांना विचारतो की, टीचरचा नंबर काय आहे. त्यावेळेला शाळेतली मुलं नंबर सांगतात, प्रीतम तो नंबर डायल करतो आणि आनंदात म्हणतो की, मला नंबर मिळाला असं म्हणत तो पळून जातो.
प्रीतम पारुला येऊन सांगतो की, तिला पाहून माझ्या मनात काहीतरी झालं आहे आणि ही नक्कीच प्रेमाची भावना आहे आणि हे खरं प्रेम आहे. मी खोटं नाही सांगत आहे. आता प्रीतम टिचरांच्या प्रेमात पडला आहे. तर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत डेटवर गेलेले असतात तेव्हा पत्ता विचारायचा बहाणा करून काही माणसं श्रीकांतला गाडीत टाकून घेऊन जातात. आता मुंबईला गेल्यावर प्रीतम व त्या टीचरबरोबर फोनवर बोलणार का?, दिशाबरोबर लग्नाला नकार देणार का?, अहिल्यादेवी श्रीकांतची सुटका करणार का? हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.