शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर सत्य आलं समोर, पारूने हरीशला लग्नाबाबत खरंखुरं सांगितलं अन्…; आता कायमची घर सोडूनही जाणार का?

काजल डांगेby काजल डांगे
जुलै 21, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

अखेर सत्य आलं समोर, पारूने हरीशला लग्नाबाबत खरंखुरं सांगितलं अन्…; आता कायमची घर सोडूनही जाणार का?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, हरीशला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरु असतो तर हरीशच लक्ष पारूने दिलेला त्या चिठ्ठीकडे लागून राहिलेलं असतं. तर दामिनी व दिशा ती चिठ्ठी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. दामिनी हरीशला हळद लावायला म्हणून पुढे जाते त्यावेळेला ती हरीशच्या हातातून चिठ्ठी काढून घेते. तेव्हा हरीश सांगतो ती इम्पॉर्टंट चिठ्ठी आहे मला हवी आहे. यावर दामिनी त्याला शांत करत कामाचीच असेल ना चिठ्ठी असं विचारते. आज तुझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण आहे त्यामुळे काम वगैरे राहू दे. हे सगळं झालं की तू माझ्याकडून येऊन ती चिठ्ठी पुन्हा परत घे, असं म्हणत ती चिठ्ठी घेऊन जाते. (Paaru Serial Update)

त्यानंतर सावित्री म्हणते आता काही झालं तरी पारू व हरीश सरांची भेट व्हायलाच हवी. त्यामुळे आता मलाच काहीतरी करायला हवं, असं म्हणत सावित्री किचनमध्ये जाते आणि हाताला लाल तिखट चोळून घेऊन येते आणि त्या हाताने ती हरीशला हळद लावते. त्यानंतर हरीशला हळद चुरचुरु लागते. तेव्हा हरीश तोंड धुवायला म्हणून खोलीत जातो तर इकडे येऊन सावित्री आत्या पारूला सांगते की, तुला मागच्या दरवाजाने हरीश सरांच्या खोलीत जायचं आहे. ते तुला तिकडेच भेटतील. यावर पारू सावित्रीला सांगते की, मी खूप वाईट आहे आपल्यामुळे हरीश सरांना खूप त्रास होत आहे, असं नको व्हायला हवं होतं. पण माझ्यापुढेही काहीच पर्याय नाही आहे असं म्हणत ती रडू लागते. तेव्हा सावित्री तिला धीर देते त्याच वेळेला सावित्री पारूच्या हातात गाठोड पाहते आणि विचारते तू हे गाठोड का घेतलं आहेस?, यावर पारू सांगते की, आज माझी आणि हरिश सरांची भेट झाली नाही तर मी हे घर सोडून जायचा निर्णय घेईन. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. थोडे दिवस सर्वांना वाईट वाटेल पण नंतर सगळेजण विसरुन जातील की पारू नावाची एक मुलगी या घरात होती.

आणखी वाचा – ‘या’ दिवशी येणार ‘नवरा माझा नवसाचा २’, सचिन पिळगांवकरांनी खास व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, म्हणाले, “यावेळी…”

हरीशला भेटायला जाते त्यानंतर दिशा व दामिनीची चिट्ठी उघडून बघतात तेव्हा ती चिठ्ठी पूर्णतः हळदीनं माखलेली असते त्यामुळे त्यांना त्या चिठ्ठीवर काय लिहिलं आहे ते वाचतासुद्धा येत नाही. पारू हरीशला लपूनच भेटायला येते आणि सांगते की, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला माफ करा माझं लग्न झालं आहे. यावर हरीश तिला विचारतो की, तू काय बोलत आहेस तुला कळतंय का?, तुझं कोणाशी लग्न झालं आहे?. यावर पारू सांगते की तुम्ही माझ्याबरोबर लग्नाला बसणार म्हणून मी त्या ऍड शूटसाठी होकार दिला पण आयत्या वेळेला तुम्ही गायब झालात आणि त्यावेळेला तिथं आदित्य सर बसले.

आणखी वाचा – ‘या’ कारणांमुळे करीनाला सैफ अली खानबरोबर राहणं झालं कठीण, अभिनेत्रीने स्वतः खुलासा करत सांगितलं कारण, म्हणाली, “आमच्या नात्यात…”

आदित्य सरांनी स्वतः मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातले. हे ऐकल्यावर हरीशच्या पायाखालची जमीन सरकते. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दामिनी अहिल्यादेवींना येऊन सांगते की पारू घरात नाही आहे. ती कुठेतरी पळून गेली आहे. अहिल्यादेवीसमोर आता हे सगळं सत्य येणार का?, हरीश यावर आता काय निर्णय घेणारे हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialpaaru seriaPaaru Serial Updatezee marathi
काजल डांगे

काजल डांगे

काजल डांगे या 'इट्स मज्जा' वेबसाईटच्या सीनिअर एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. 'लोकसत्ता' ऑनलाईनमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून त्या दीड वर्ष कार्यरत होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Devendra Fadnavis at Dharmaveer 2 trailer launch

'धर्मवीर २' नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चित्रपट येणार, इच्छा व्यक्त करत म्हणाले, "आमच्या सिनेमात अनेक मुखवटे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.