‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळतंय की, ब्रँड शूटसाठी अहिल्यादेवींनी परवानगी दिलेली असते. तर पारू व हरीश ब्रँडच्या शूटसाठी तयार झालेले असतात. सगळेजण त्या ठिकाणी येतात तेव्हा प्रीतम आणि आदित्य सगळी जबाबदारी सांभाळत असतात. आदित्य म्हणतो की, पारू आणि हरीश कुठे आहेत त्यांना बोलावून घे. तितक्यात प्रीतमला दामिनी दिसते. प्रीतम दामिनीला म्हणतो, आज तुम्ही इथे कशा म्हणजे कामाच्या ठिकाणी तुम्ही कधी येत नाही ना?, यावर दामिनी सांगते की तुम्ही दोघेच इथे आहात त्यामुळे घरातील कोणीतरी मोठं इथे हवं होतं म्हणून मी आज इथे आले आहे आणि मी इथेच थांबणार आहे. (Paaru Serial Update)
त्यानंतर पारू आणि हरीश येतात तेव्हा आदित्य सांगतो की, आता मॅक येईलच मी तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देतो. मात्र त्यांच्याच कंपनीच्या दुसऱ्या मॅडम आणि तिची सेक्रेटरी तिथे येते. सगळ्यांची भेट ओळख झाल्यानंतर आदित्य त्यांना सेट दाखवायला घेऊन जातो तर पारू आणि हरीश तयार व्हायला जातात. तिकडे पारू तयार होत असते तर तिकडे हरीश तयार होत असतो. तेव्हा प्रीतम म्हणतो, हरीश एकदम परफेक्ट तयार झाला आहेस. त्यानंतर दामिनी तिचा नवा डाव साधते. दामिनी एका मुलीला विचारते की इथे मेकअप रूम कुठे आहे त्यावर ती नवऱ्या मुलाची मेकअप रूम इथे असल्याचे सांगते आणि दामिनी ज्युस मागवून त्यात झोपेची गोळी टाकते आणि एका माणसाला पैसे देत त्याला हे काम फत्ते करायला लावते.
त्यानंतर हरीश ते ज्यूस पितो आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडतो. त्यानंतर दामिनी दिशाला फोन करून सांगते की, हरीश बेशुद्ध पडला आहे त्यामुळे तू तुझा डाव सुरू कर. दिशा व्हीलचेअर घेऊन मेकअप रूम मध्ये येते आणि दिशा आणि दामिनी मिळून हरीशला व्हीलचेअरवर बसवतात आणि मागच्या दरवाजाने कारकडे घेऊन येतात. त्यानंतर एका माणसाच्या मदतीने ते हरीशला कारमध्ये टाकतात आणि दिशा त्या कारमधून हरीशला घेऊन जाते. इकडे पारू तयार झालेली असते तेव्हा आदित्य पारूला बोलवायला येतो तेव्हा पारूला तो पाहतच राहतो. नवऱ्या मुलीसारख्या वेशात पारूला पाहून आदित्यला धक्काच बसतो तर आदित्यला काही वेळासाठी असं वाटतं की हेच तर ते डोळे नाही आहेत ना?, यावर आदित्यचा विश्वासच बसत नाही त्यानंतर आदित्य पारूच्या डोक्यावरच्या वाकड्या असलेल्या टिकलीला सरळ करतो. तितक्यात तिथं प्रीतम येतो आणि सांगतो की हरीश आपल्या खोलीत नाही आहे. तेव्हा आदित्य आणि प्रीतम हरीशला बघायला येतात तेव्हा हरीशच्या वतीने दिशा आणि दामिनीने ठेवलेली चिठ्ठी त्यांना सापडते. त्यात मला खूप अर्जंट काम आल आहे, त्यामुळे मला जावं लागेल ते काय काम आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन असं लिहिलेलं असतं.
हे ऐकून आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्य सांगतो की आता हे शूट थांबवावच लागेल कारण हरीश शिवाय हे शूट आणखी कोणीच करू शकत नाही. आणि हा आईचा शब्द आहे. तर मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, हरीश ऐवजी आदित्य या ब्रँड शूटसाठी तयार होतो. तर हे लग्न अगदी दिमाखात पार पडतं. त्यानंतर पारू कडून सगळे दागिने काढून घेतात मात्र ती गळ्यातील मंगळसूत्र काढायला नकार देते. आता आदित्य या शूटसाठी कसा तयार झाला, अहिल्यादेवींचा शब्द मोडून हे शूट झालं आता त्या यावर काय ऍक्शन घेणार हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.