बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी अफेअर, नंतर लग्न अन्…; लग्नाला तीन महिने पूर्ण होताच सुप्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यापासून वेगळी होणार, फोटोही केले डिलिट

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 27, 2024 | 7:00 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
divya agarwal wedding photo delete

आधी अफेअर, नंतर लग्न अन्...; लग्नाला तीन महिने पूर्ण होताच सुप्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यापासून वेगळी होणार, फोटोही केले डिलिट

अभिनेत्री दिव्या अग्रवाल २० फेब्रुवारी २०२४ रोजी अपूर्व पाडगांवकरबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकली. मनोरंजन क्षेत्रांमध्ये त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. गुढीपाडव्यानिमित्त दिव्याने दोघांचेही गुढी उभारतानाचे फोटो शेअर केले होते. त्यानच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. पण आता लग्नाच्या तीन महिन्यांनंतर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नुकतेच दोघेही हनिमूनवरुन परतले आहेत. त्यानंतर लगेच दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नाचे सगळे फोटो डिलिट केले आहेत. (divya agarwal wedding photo delete )

एका रेडिट युजरने सांगितळे आहे की, “दिव्याने अपूर्वबरोबरचे लग्नातील सगळे फोटो डिलिट केले आहेत. दिव्याच्या फिडवर शेवटची पोस्ट १९ मार्च २०२४ची आहे. यामध्ये एक कोलॅब व्हिडीओ आहे. प्रोफेशनल फोटोशूट व प्रोजेक्टसंदर्भात पोस्ट वगळता दिव्याने आपल्या इन्स्टाग्रामवरुन सर्व फोटो डिलिट केले आहेत”.

आणखी वाचा – “रुपालीलाच मालिकेतून काढून टाका”, ‘अप्पी आमची…’वर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “कलेक्टरच्या पोस्टला…”

View this post on Instagram

A post shared by Divya Agarwal (@divyaagarwal_official)

तसेच अपूर्वबरोबरचा एकही फोटो ठेवला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा झाली. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हंटले की, “हा एक पीआर स्टंट वाटत आहे”, दुसरं नेटकरी म्हणाला की, “दिव्याने उगाच लक्ष वेधून घेण्यासाठी असे केले आहे”, तसेच अजून एक नेटकरी म्हणाला की, “यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, तिला सवय आहे”.   

आणखी वाचा – “दादर पोलीस स्टेशनमध्ये…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लोकल ट्रेनमध्ये मिळालेल्या वाईट वागणुकीची पोलिसांनी घेतली दखल, म्हणाली, “मॅसेज, कॉल्स करुन…”

दिव्याबरोबरच तिचा पती अपूर्वने लग्नातील सर्व फोटो डिलिट केले आहेत. मात्र दिव्याबरोबरचे काही फोटो ठेवले आहेत. २४ मार्च रोजी दिव्या व अपूर्वला एकत्रित पाहण्यात आले होते. यावेळी दिव्याने सॅटिन-प्रिंटेड ड्रेसबरोबर सोनेरी रंगाचे दागिने घातले होते. तसेच यावेळी अपूर्वने जीन्स व क्लासी गॉगल घातले होते. यावेळी फोटोग्राफर्सनी लग्नाबाबत काही प्रश्नदेखील विचारले. लग्नामध्ये ती खूप खुश असल्याचे तिने सांगितले. मात्र आता अचानक लग्नाचे फोटो डिलिट करण्यामागे काय कारण आहे हे मात्र समजू शकले नाही. दिव्या व अपूर्व लवकरच या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देतील अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

Tags: apurv padgaonkarDivya Agarwalweddingwedding photos
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
28 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

‘मिथुन’सह ‘या’ राशींसाठी मंगळवारचा दिवस आर्थिक फायद्याचा, प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या...  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.