रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

किर्लोस्कर कुटुंबावर खूप मोठं वादळ, पारूही मुंबई सोडून कायमची गावी जाणार, मालिकेत येणार मोठं वळण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 2, 2024 | 10:34 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

किर्लोस्कर कुटुंबावर खूप मोठं वादळ, पारूही मुंबई सोडून कायमची गावी जाणार, मालिकेत येणार मोठं वळण

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे अहिल्यादेवींचा संताप झालेला असतो. त्या त्यांच्या खोलीत असताना श्रीकांतशी बोलतात आणि म्हणतात की, आज मी पहिल्यांदा आदित्यवर हात उचलला. याआधी त्याने त्याच्यावर मला हात उचलायची कधी संधीच दिली नाही एवढी मोठी चूक करुन बसला की मला हे करणं भाग पडलं. जर त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून इतके दिवस लपवली होती तर यासारख्या अजून किती गोष्टी असतील ज्या त्याने माझ्यापासून लपवून ठेवल्या आहेत. असा प्रश्न त्या श्रीकांतला विचारतात.यावर श्रीकांत काहीच बोलत नाहीत आणि ते अहिल्यादेवींना आधार देतात. अहिल्यादेवी पूर्णता कोलमडून गेलेल्या असतात तेव्हा त्या आदित्यच्या लहानपणीचा फोटो घेऊन बसलेल्या असतात. तर इकडे पारू, मारुती हे देखील विचारांमध्ये रडत रडत बसलेले असतात. (Paaru Serial Update)

तर आदित्य पूर्णता कोलमडलेला असतो त्या वेळेला प्रीतम तिथे येतो आणि प्रीतम या सगळ्याचा खापर तू एकट्यावर का घेतोय असं म्हणतो. मात्र आदित्य प्रीतमला म्हणतो की, यांत तुझी काही चूक नाही आहे हे सगळं माझ्यामुळेच झालं आणि त्यामुळेच आईने माझ्यावर आज पहिल्यांदा हात उचलला याचं मला फार वाईट वाटतं आहे. मी लायक असा मुलगाच नाही आहे त्यामुळेच आईला माझ्यावर हात उगारावा लागला. हे ऐकल्यावर प्रीतमलाही वाईट वाटतं तर आदित्यला खूप रडू येतं. त्यानंतर प्रीतमही बाहेर जाऊन रडू लागतो.तर दामिनीला इकडे घराबाहेर काढलेले असतं त्यामुळे ती घराबाहेर बसून कोणी तिला घरात घेते का याची वाट पाहते. तेव्हा ती दिशाला फोन करते तेव्हा दिशा तिला सर्वन्ट कॉटर मध्ये जाऊन रहा. उद्या आपण सगळे याचं काहीतरी बघू असं सांगते. दिशाला या घरावर राज्य करायचं असतं म्हणून ती आगीत तेल ओतण्यासाठी किर्लोस्कर बंगल्यातच राहायचा निर्णय घेते. दुसऱ्या दिवशी इकडे पारू देवाला नमस्कार करत हे संकट दूर कर असं सांगत असते त्याच वेळेला तिथे सावित्री आत्या येते.

आणखी वाचा – त्रिनयना देवीने नेत्राच्या ओटीत दिलेल्या वस्त्राचं नेमकं रहस्य काय? देवी आई लेकींना नवीन मार्ग दाखवणार का?

सावित्री आत्या तिथे येऊन म्हणतात की, बंगल्यात कोणीच काल जेवलं नाही आहे आणि सगळ्यांनी प्रत्येकाला आपापल्या खोलीत कोंडून घेतले आहे हे ऐकल्यावर पारू सांगते की, इतकं मोठं सत्य समोर आल्यावर हे असं होणं साहजिकच होतं. यावर सावित्री म्हणते की, अजून एक सत्य सर्वांसमोर येणं बाकी आहे. तू आदित्य सरांना नवरा मानते हे सत्य अजून इतरांसमोर आले नाही. हेच तू काल का नाही सांगितलं. हे आणखी एक सत्य लगेच पचवता आलं असतं. हे ऐकल्यावर पारू शांत बसते आणि म्हणते की, माझी आता फक्त एकच इच्छा आहे की आदित्य सर आणि देवीआई यांनी एकमेकांशी पहिल्या सारखं बोलावं. या पलीकडे मला काहीही नको आणि मला तुम्हा सगळ्यांची सेवा करायची आहे. यावर सावित्री पारूला खूप काही सुनावतात.

आणखी वाचा – प्रशस्त हॉल, भारतीय पद्धतीची बैठक अन्…; ‘मुरांबा’ फेम स्मिता शेवाळेचं घर आहे इतकं सुंदर व आकर्षक, Inside Video

त्यानंतर पारू असं म्हणते की, इतकंच जर असेल माझ्यामुळे जर या गोष्टी घडत असतील तर मी माझ्या गावी पुन्हा निघून जाते. मला इथे राहायचं नाही आहे. मला फक्त तुमची सेवा करायची होती म्हणून मला इथे राहायचं होतं पण आता माझ्यामुळेच एवढ्या गोष्टी टोकाला जाणार असतील तर मी इथे राहून तरी काय साध्य होणार असं ती म्हणते. आता मालिकेच्या पुढील भागात पारू खरंच मुंबई सोडून गावी जाणार का हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Salman Khan shooting case Panvel police filed charge sheet Lawrence Bishnoi group given details of a conspiracy to kill him

सलमान खान गोळीबाराचे बिश्नोई कनेक्शन, मारण्यासाठी थेट पाकिस्तानातून मागवली होती शस्त्रे अन्...; नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.