Paaru Marathi serial Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन करतात. या मालिका नेहमीच वेगवेगळे टर्न अँड ट्विट घेऊन प्रेक्षकांसमोर येतात. या वाहिनीवरील नेहमीच चर्चेत असलेली मालिका म्हणजे पारू. गावाकडून शहरात आलेल्या पारूचा नव्याने सुरु झालेला प्रवास ते आता आदित्य किर्लोस्करची पत्नी म्हणून सुरु झालेली वाटचाल पाहणं मालिकेत रंजक ठरतंय. ‘पारू’ या मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ‘पारू’ ही मालिका सुरू झाल्यापासून रसिकांच्या मनात घर करत आहे. मालिकेत पारू आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली आहे. मात्र सध्या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे.
झी-मराठी वाहिनीने मालिकेचा नवा प्रोमो सादर केला आहे. ज्यामध्ये किर्लोस्कर घरात नवं वादळ आलेलं दिसतंय. प्रोमोमध्ये आदित्यची आई अहिल्यादेवी गंभीर आजारी असल्याचं दिसत आहे. आदित्यला घाबाहेर काढल्यापासून तिने काहीच खाल्लेलं नसतं म्हणून तिची तब्येत खालावते. त्यामुळे घरातील सर्वजण टेन्शनमध्ये येतात. दरम्यान डॉक्टर येऊन अहिल्यादेवींची तपासणी करतात आणि सांगतात की, “अहिल्याची नीट काळजी घ्यावी लागेल. त्यांनी काही खाल्लं आहे का?, त्यावर घरातील सगळे नाही म्हणतात.
आणखी वाचा – टीव्ही अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा आगीत होरपळून मृत्यू, धाकटा होता प्रसिद्ध बालकलाकार
त्यावेळी डॉक्टर विचारतात, ‘ती पारू कुठे आहे? ती यांची चांगली काळजी घेते आणि आदित्यही दिसत नाही तो बरोबर काळजी घेतो’. हे ऐकताच घरातले सर्वजण शॉक होतात. तर दुसरीकडे एक अनोळखी माणूस आदित्य-पारू जवळ येतो आणि विचारतो, “तूच ना आदित्य?” यावर आदित्य उत्तर देतो, “हो, मीच आदित्य.” त्यावर तो अनोळखी माणूस म्हणतो, ‘काय रे तू आदित्य? तुझी आई अहिल्यादेवी मरणाला टेकली आहे, आणि तू अजून राग धरून बसलायस?” हे ऐकताच आदित्य आणि पारू खूपच शॉक होतात.
तर आता मालिकेत पुढे पारू आणि आदित्य पुन्हा किर्लोस्कर घरात अहिल्यादेवींना भेटायला जातील का?, आणि अहिल्यादेवी आदित्य-पारूला घरात येऊ देतील का?, हे पाहणं निश्चितच मनोरंजक ठरणार आहे.





