गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मृत्यूच्या खोट्या बातमीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता स्पष्टच बोलला, म्हणाला, “दुसऱ्यांदा झालं आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 30, 2025 | 11:33 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
samir choghule

मृत्यूच्या खोट्या बातमीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता स्पष्टच बोलला, म्हणाला, "दुसऱ्यांदा झालं आणि…"

samir choghule : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्यात अनेकदा एखादी बातमी वाऱ्यासारखी पसरते. बरेचदा कलाकारांबाबत वाईट वा चांगल्या गोष्टीही तुफान व्हायरल होतात. अनेकदा कलाकारांच्या निधनाच्या अफवाही पसरतात. पण अर्थातच ही वाईट बाब आहे की चुकीच्या आणि तेही निधनाच्या बातम्या पसरवणं. यावर अनेकदा त्या कलाकारांनी भाष्य करत खरपूस समाचारही घेतला आहे. अशातच या मुद्द्यावर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यानेही भाष्य केलं आहे. नेहमीच त्याच्या विनोदी शैलीने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगने रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता समीर चौघुलेने या विषयावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

समीर चौघुले यांनी ‘MHJ Unplugged’ या पाॅडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक किस्से सांगितले. यावेळी त्यांनी मृत्यूची खोटी बातमी पसरलेली याबाबतही भाष्य केलं. पाॅडकास्टचे होस्ट अमित फाळके यांनी त्यावेळी नेमकं काय झालेलं?, असं समीर यांना विचारलं. यावर समीर चौघुले म्हणाले की, “हे दुसऱ्यांदा झालंय, एकदा पण अशीच बातमी पसरली होती. करोना काळात आम्ही ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही मालिका केली. ती मी लिहायचो पण आणि त्यात मी कामसुद्धा करायचो. त्याचं शुटींगच सुरु होतं”.

आणखी वाचा – वाईट कमेंट्स, घाणेरडे रील आणि…; ट्रोलिंगवर मराठमोळी मायरा वायकुळ स्पष्टच बोलली, म्हणाली, “खूप भयानक…”

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

पुढं ते म्हणाले, “त्यामुळे मी माझ्या मोबाईलवरच शूट करायचो, म्हणून मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवलेला. आधीच कोणीतरी आपल्या ग्रुपवर हे टाकलेलं आणि सगळीकडे ते पसरलेलं. सई मला फोन करत होती, तिने मला पहिल्यांदा सांगितलं की सम्या मला तुझा फक्त आवाज ऐकायचा होता. मी काय झालं म्हटलं, मला काहीच माहित नाही. ती म्हणाली, ते ग्रुपवर आलंय असं-असं, पाहिलं नाहीस का तू? आणि मग त्यानंतर सरांचा फोन आला. मग त्या माणसाने सांगितलं चूक झाली. त्यानंतर त्याने काढली ती पोस्ट”, असं समीर यांनी पुढे सांगितलं.

आणखी वाचा – किस करायला जवळ आले आणि…; अभिनेत्रीने सुप्रसिद्ध निर्मात्यावर गंभीर आरोप करताच सोडलं मौन, म्हणाले, “आजकाल प्रसिद्धीसाठी…”

सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक छगन चौघुले यांचं करोनामध्ये निधन झालं होतं. त्यामुळे छगन चौघुलेंना आदरांजली देण्याऐवजी समीर चौघुलेंचा फोटो वापरुन ही खोटी बातमी पसरवली होती. अर्थात अशा गंभीर चुका होणं हे लज्जास्पद आहे.

Tags: fake newsmaharashtrachi hasyajatrasamir choghule
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Paaru Marathi serial Promo

अहिल्यादेवींची तब्येत खालावली; आदित्य-पारू मदतीसाठी धावणार, किर्लोस्कर मेन्शनमध्ये एंट्री घेणार आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.