Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम आणि प्रियाचं लग्न झाल्यानंतर आता त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होणार असते. पारू प्रियाला घेऊन तिच्या खोलीत येते तर प्रीतम आदित्यच्या खोलीत जातो मात्र प्रीतमला प्रियाशिवाय राहवत नाही. ती काय करत असेल या विचारात तो असतो तेव्हा प्रीतम प्रियाला बघायला म्हणून खोलीत येतो तर प्रिया एकटीच असते हे पाहून प्रीतम म्हणतो की, मी आता इथेच राहणार आहे. आता इथे कोणी येणार नाही त्यामुळे आपण एकत्रच राहू. यावर प्रिया सांगते की, अहिल्यादेवींनी काय सांगितले आहे माहिती आहे ना?, त्यामुळे तुम्ही आताच्या आता इथून जा. मात्र प्रीतम काही ऐकत नाही. तितक्यातच तिथे पारू येते आणि प्रीतम सरांना तिथून पाठवून देते.
पारू गेल्यानंतर प्रीतम पुन्हा काही वेळाने येतो आणि त्याच वेळेला अहिल्यादेवी तिथे येतात. अहिल्यादेवी सांगतात की, जोपर्यंत पूजा, गोंधळ होत नाही तोवर तुम्ही एकत्र राहू शकत नाही. आज इथे श्रीकांत झोपेल तर मी प्रियाला माझ्याबरोबर घेऊन जात आहे. हे ऐकल्यावर प्रीतमचा हिरमोड होतो तर प्रीतम आदित्य कडे तणतणत येतो आणि सांगतो की, आता तर आमचं लग्न पण झालं आहे तरीसुद्धा आम्ही वेगळे राहत आहोत हे काय चुकीचं आहे. यावर प्रीतम सांगतो की, काही दिवसातच तुझी सुद्धा प्रायव्हसी जाणार आहे तुला सुद्धा आई मुलगी शोधते. यावर आदित्य सांगतो की माझ्यासाठी असणारी मुलगी ही नेमकी कशी असेल?, याच विचारात मी आहे. यावर प्रीतम सांगतो की, ती नक्कीच चांगली असेल तर इकडे पारू देवाच्या पाया पडत असते.
आणखी वाचा – Bigg Boss फेम अभिजीत सावंतने सुरु केलं व्लॉगिंग, बायकोबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
तेव्हा मारुती त्यांच्या मागून येतो आणि सांगतो की, तू जे काही केलं आहे ते चांगलं केलं असं तुला वाटत असेल पण ते तितकंच चूक आहे. गावाकडे तू आदित्य सरांची बायको म्हणून त्यांच्याबरोबर राहिली हे अत्यंत चूक आहे आणि हे जर तू मला सांगितलं असतं तर मी तुला असं कधीच करू दिलं नसतं. ते आपले मालक आहेत आणि आपण त्यांचे नोकर आहोत. मालक आणि नोकर यांच्यातला फरक कधीच मोडू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट तू खूप चुकीची केली आहेस असं म्हणत तिला आदित्य सरांपासून लांब राहण्याचा सल्ला देतो.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम आणि प्रियासाठी लग्नानंतरचे खेळ खेळले जातात तेव्हा आदित्य व पारू सुद्धा यांत सहभागी होतात. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.