Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दामिनी पारूला तू या घरातील नोकर आहेस असं सतत सांगत असते. यावर पारूचा संताप होतो आणि पारू सांगते की, मला माझी या घरातील जागा माहित आहे आणि माझ्या वडिलांनी माझ्यावर संस्कार देखील केले आहेत त्यामुळे मी कोणतीच मर्यादा ओलांडणार नाही. तुम्ही मी नोकर असल्याचा मला सतत सांगू नका, असं सांगते. त्यानंतर असं म्हटल्यावर दामिनीचा अपमान होतो. ती रागारागात घराबाहेर येते. त्याच वेळेला तिथून मारुती जाताना दिसतो. तेव्हा ती मारुतीला अडवते आणि विचारते की, तुझ्या हातात काय आहे. तेव्हा मारुती सांगतो की, माझ्या हातात पारूसाठी काही मी गोष्टी आणल्या आहेत. ती अवॉर्ड फंक्शनला आदित्य बाबांबरोबर जाणार आहे ना म्हणून.
हे ऐकल्यावर दामिनी पुन्हा त्याला डीवचत म्हणते की, तुला मी कितींदा सांगितलं की, वयात आलेल्या मुलीला एका वयात आलेल्या मुलाबरोबर सोडू नकोस. यावर मारुती म्हणतो की, माझ्या मुलीवर माझे संस्कार आहेत. त्यामुळे मी तिच्यावर अविश्वास दाखवणं हे चुकीचं आहे आणि आदित्य बाबा हे आमचे मालक आहेत. त्यांनी दिलेला आदेश मला पाळावाच लागेल. यावर दामिनीचा अपमान होतो आणि ती म्हणते, मग मी कोण आहे?. यावर मारुती सांगतो की, तुम्ही सुद्धा आमच्या मालकीण बाईच आहात. पण आदित्य बाबांची गोष्ट वेगळी आहे. हे ऐकल्यावर दामिनी त्याला आणखीनच सुनावते. त्यानंतर तो तिथून निघून जातो तेव्हा दामिनी म्हणते की, मी माझं काम केलं आहे आता पुढे काय करायचं ते त्याचं त्यालाच ठरवू दे.
आणखी वाचा – अमेरिकेमध्ये शिकत आहे ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा लेक, लेकाबद्दल म्हणाले, “त्याच्याबरोबर काम करायचंय आणि…”
अनुष्का व आदित्य खोलीत असतात तेव्हा अनुष्का आदित्यला विचारते, तुझी सगळी तयारी झाली आहे का हे मी पाहायला आले. तेव्हा आदित्य सांगतो की, मला माझी तयारी करायची काहीच गरज नाहीये, कारण पारूने माझं सगळं काही रेडी करुन ठेवलं आहे. फक्त बॅग उचलून मला निघायचं आहे. हे ऐकल्यावर अनुष्का शांत होते. त्यानंतर सगळेचजण आपापल्या घरी जायला निघतात. अनुष्का तिच्या घरी जायला निघते. तितक्यातच अहिल्यादेवींना ती दाराआड पाहते आणि मुद्दाम आदित्यला दूध पिण्यासाठी हट्ट करण्याचं नाटक करते आणि त्याची काळजी घेते. हे सगळं पाहून अहिल्यादेवी खूप खुश होतात आणि अहिल्यादेवी दोघांचं पण कौतुक करतात. त्यानंतर अनुष्का निघून जाते तेव्हा अहिल्यादेवी आदित्यची गंमत करत, तू इतका रोमँटिक असशील असं वाटलं नव्हतं असं म्हणतात.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटामाटात पार पडलं केळवण, फोटो व्हायरल
दुसऱ्या दिवशी सगळेजण जायला निघतात. तेव्हा अनुष्का व आदित्य अहिल्यादेवींच्या पाया पडून नमस्कार करतात. त्या वेळेला एक जोडीदार म्हणून तुमचा आजचा प्रवास सुखकर होवो आणि तुमचे पुढचे प्रवास हे तुमच्या कायम लक्षात राहो असे म्हणतात. आता पारू देखील आदित्य बरोबर जाणार असते, त्यामुळे वाटेत काही अडचण तर येणार नाही ना हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.