Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर घरावरील संकट आता गूढ होताना पाहायला मिळतंय. मालिकेत अहिल्यादेवींची तब्येत खराब असल्याने चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर अहिल्यादेवींच्या तब्येतीची संपूर्ण जबाबदारीही पारूवर सोपवण्यात आलेली असते मात्र दामिनीने सांगितलेल्या उपायामुळे पारू अहिल्यादेवींना कोणतीच मदत करत नाही. अहिल्यादेवींना पाणी हवं असतं तेव्हा त्या पारूकडे पाण्याची मागणी करतात तेव्हा पारू पाणी आणायला जाते असे सांगून पुन्हा काही परत येत नाही. तेव्हा दामिनी येऊन पारूला सांगते की, या निर्जळ उपवासाबद्दल कोणालाही काहीच माहिती देता कामा नये आणि अहिल्यादेवींना त्रास होतोय हे पाहून मला सुद्धा त्रास होतोय, असं म्हणत ती खोटं नाटक करते.
पारू निघून गेल्यावर दामिनी म्हणते की, पारू आपल्या जाळ्यात किती पटकन अडकते. या चांगल्या लोकांना फसवणं किती सोप्प आहे, असं म्हणत दामिनी आनंद व्यक्त करते. तर इकडे प्रियाचे देखील येऊन ती कान भरताना दिसते. आदित्य त्याच्या कामानिमित्त ऑफिसला गेलेला असतो तेव्हा कंपनीच्या नव्या वेंचरबाबत आदित्य व अहिल्यादेवींनाच माहित असतं, याबद्दल इतर कोणालाही माहिती नसल्याचं ती प्रियाला सांगते. आणि ही गोष्ट प्रीतम पासूनही त्यांनी लपवून ठेवली आहे म्हणजेच आदित्य उद्या जाऊन सगळं काही स्वतःच्या नावावर करेल आणि हा व्यवसायही त्याच्याच नावावर होईल आणि प्रीतमला आणि तुला काहीच मिळणार नाही.
तुम्हाला दोघांना गावाकडे निघून जावं लागेल, असं म्हणत प्रियाचे दामिनी सतत कान भरत असते. त्यामुळे प्रियाच्याही मनात गोंधळ सुरु असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पारू अहिल्यादेवींना बघायला येते तर अहिल्यादेवी बेडरूममध्ये खाली पडलेल्या असतात. पारू त्यांना उठवायला जाते तितक्यात तिथं दामिनी पोहोचते. पारू सांगते की, हे निर्जळी उपवासाचं काय घेऊन बसला आहात तुम्ही, इथं माणसाचा जीव जायला आलाय असं म्हणत पारू जाते आणि त्यांच्यासाठी साखरपाणी घेऊन येते .पारु पाणी घ्यायला जाते तोवर दामिनी खोटं नाटक करत प्रियाला बोलावून घेते आणि सांगते की, इथं पाण्याचा ग्लास सुद्धा नाहीये पारूवरही जबाबदारी सोपवली होती पण तारुणाईला अहिल्यादेवींची काहीच काळजी घेतलेली नाहीये. पारू पाण्याचा ग्लास घेऊन येते तर ते पाणी दामिनी पिऊन टाकते आणि सांगते आता सुद्धा ती पाणी घेऊन आलेली नाहीये. त्यानंतर प्रिया प्रीतमला फोन करुन बोलावून घेते तर दामिनी आदित्यला बोलावून घेते.
आणखी वाचा – सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाचा पहिला फोटो समोर, आई-वडिलांनी फोटो शेअर करत दाखवली झलक, पाहून नेटकरीही थक्क
सगळेजण घरी आलेले असतात तेव्हा अहिल्यादेवींची तब्येत अधिक खालावते. यावर प्रिया आदित्यकडे तक्रार करते की, ज्याच्यावर तुम्ही ही जबाबदारी सोपवून गेला होता तिलाच तुम्ही याबद्दल विचारा तिने अहिल्यादेवींची काहीच काळजी घेतलेली नाहीये. यावर आदित्य पारूकडे रागाने बघतो. आता मालिकेत पुढे काय होणार हे सार पाहणं रंजक ठरेल.