Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रिया व प्रीतम यांच लग्न झालेलं असतं आणि आता त्यांच्या लग्नानंतरचे विधी सुरु असतात. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारुच्या हस्ते प्रिया व प्रीतमची लग्नगाठ बांधण्यात येते त्यामुळे सावित्री पारूचं भरपूर कौतुक करते आणि सांगते की, किर्लोस्कर यांच्या थोरल्या सूनेकडून हे झालं याचं मला फारच कौतुक वाटते. किर्लोस्करांची थोरली सून म्हणून तुला हा मान मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. हे ऐकल्यानंतर पारूदेखील खुश होते, तर इकडे डायनिंग टेबलवर सगळेजण जेवण करायला बसलेले असतात. डायनिंग टेबलवर बसताना प्रिया चुकून दामिनीच्या जागेवर बसते, यावर प्रीतम तिला म्हणतो, ‘तिकडे कुठे बसली आहेस या बाजूला ये’.
यावर अहिल्याबाई, ‘राहू दे’ म्हणत तिथेच बसायला सांगतात. दामिनी येऊन पाहते तर तिचा पारा चढतो. दामिनी म्हणते, ‘एक दिवस झाला नाही या घराची सून होऊन आणि तू माझी जागा बळकवायला निघालीस, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या खुर्चीत बसायची’, हे बोलल्यावर प्रिया उठून माफी मागते आणि सांगते की, ‘तुम्ही येऊन इथे बसा, मी मुद्दाम काहीच केलं नाही’. मात्र अहिल्यादेवी प्रियाला सांगतात, ‘तू आहे त्याच जागेवर बसशील’. त्यानंतर अहिल्यादेवी दामिनीला विचारतात, ‘एवढा आवाज का वाढला आहे?’, यावर दामिनी सांगते की, ‘माझ्या जागेवर बसायची हिंमतच कशी झाली. मी कधी तुमच्या खुर्चीत येऊन बसली आहे का?’.
अहिल्यादेवी सांगतात, ‘जागाही निर्माण करावी लागते प्रत्येकाच्या मनात आणि एखाद्या घरातही’. त्यानंतर अहिल्यादेवी पारुला इशारा करतात आणि हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केली जाते आणि दामिनीला सांगतात, ‘तुझ्या खुर्चीत बस’. त्यानंतर सगळेचजण तिथून उठून जातात. दामिनी डायनिंग टेबलवर एकटीच बसलेली असते बाहेर पंगत वाढलेली असते. सगळेजण पंक्तीत जेवायला बसतात तर दामिनी बाहेर येऊन सोफ्यावर जेवू लागते. जेवताना आदित्यला पारूची आठवण येते आणि पारूला सांगतो की, ‘तू सुद्धा आमच्याबरोबर जेवायला बस’. यावर पारू नकार देते. त्यानंतर जेवून झाल्यावर अहिल्यादेवी किचनमध्ये येत पारू व सावित्रीची चौकशी करतात आणि म्हणतात की, ‘तू आमच्याबरोबर जेवायला का नाही बसली?’. त्यावर पारू सांगते की, ‘अजून इतर स्टाफ आणि सावित्री आत्या सुद्धा जेवायची राहिली आहे त्यामुळे मी त्यांच्याबरोबरच जेवण करेल’, हे ऐकल्यावर अहिल्यादेवींना पारूचं कौतुक वाटतं. अहिल्यादेवी त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असतात तेव्हा दामिनी येऊन पारू बद्दल अहिल्यादेवींच्या मनात विष कालवते. तेव्हा अहिल्यादेवी उठून आदित्य कडे जातात आणि आदित्यला विचारतात की, ‘पारू ही कशी मुलगी आहे?’,
आणखी वाचा – 22 october Horoscope : मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार यश, आर्थिक भरभराटीचे आहेत संकेत, जाणून घ्या…
आदित्य पारूचं भरभरुन कौतुक करतो, तर आदित्यला विचारतात, ‘तुला कशी मुलगी हवी आहे’, यावर आदित्य सांगतो की, ‘तू जी मुलगी सांगशील तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे. तुझा शब्द शेवटचा शब्द आहे’. अहिल्यादेवीना कुठेतरी पारू व आदित्यच्या नात्याची चाहूल लागलेली असते. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रियाला गोंधळासाठीचा प्रसाद बनवायला सांगितलेला असतो, रवा भाजत असताना तिला आबांचा फोन येतो आणि ती फोनवर बोलू लागते, तेव्हा रवा करपतो. तितक्यातच पारू तिथे येते आता पुढे काय घडणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.