Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबर प्रियाचा साखरपुडा होत असतो. तो मुलगा प्रियाला अंगठी घालायला जाणार इतक्यात थांबतो आणि आबासाहेबांना थेट सवाल करतो की, “तुमची प्रॉपर्टी एकूण किती आहे”. हे ऐकल्यावर आबासाहेबांना धक्काच बसतो. तर प्रिया देखील तिथून उठून उभी राहते. त्यानंतर तो मुलगा सांगतो की, “तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे ती सर्व माझ्या नावावर करा. तरच मी तुमच्या मुलीशी लग्न करेल. आमच्या गावात सुद्धा आमचा खूप मान आहे तुमच्या घरातील ही लंकेची पार्वती मी अशीच घेऊन जाणार नाही”, हे ऐकून आबासाहेबांना धक्काच बसतो.
आबासाहेब म्हणतात की, “तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला तरी कळतंय का?, तुम्ही इतके लोभी असाल असं मला वाटलं नव्हतं”. यावर तो मुलगा सांगतो की, तिच्याशी मी असंच लग्न करु शकणार नाही. त्यामुळे तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. तर मी या लग्नाला तयार होईल”. हे ऐकल्यावर आबासाहेब स्पष्ट नकार देतात आणि त्या मुलाला निघून जायला सांगतात. त्याच वेळेला पारू देखील मध्ये बोलते आणि म्हणते की, आबासाहेब यांचा स्वभाव तुम्ही अजून ओळखलेला नाहीये. ते खूप मोठ्या मनाचे आहेत. आमच्यासारख्य परक्यांना त्यांनी आसरा दिला. तुम्ही सांगितलं नसतं तरी सुद्धा त्यांनी त्यांची प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली असती”. हे ऐकल्यावर तो मुलगा रागावतो आणि म्हणतो की, “या घरातील नोकर माणसांनाही मालकांएवढाच दर्जा दिला आहे त्यामुळे ही माणसं इतकी बोलू लागली आहेत”. हे ऐकल्यावर पारूचा आवाज चढतो आणि पारू म्हणते की, “आबासाहेबांनी आमच्यावर मुलांसारखं प्रेम केलं आहे”.
हे ऐकल्यावर तो मुलगा सांगतो की, “इतकंच असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न या नोकराबरोबर लावून द्या”. आबासाहेबांचाही पारा चढलेला असतो त्यामुळे ते इथून त्या मुलाला निघून जायला सांगतात. त्यानंतर आबासाहेब नंदीजवळ म्हणजेच प्रीतम जवळ येतात आणि सांगतात की, माझ्या मुलीची परवानगी असेल तर तू माझ्या मुलीशी लग्न करशील का?. हे ऐकल्यावर नंदी मान डोलावतो तर प्रिया सुद्धा या लग्नाला होकार देते. तेव्हा आदित्य आणि पारूला विचारण्यात येत तेव्हा आदित्यही हो असं सांगतो. मात्र प्रीतम आबासाहेबांना सर्व काही सत्य सांगतो. प्रीतम सांगतो की, मी प्रिया मॅडमना आधीपासूनच ओळखत होतो आणि त्यानंतर तो संपूर्ण कथा सांगतो. इतकं सांगून झाल्यानंतर प्रीतम आबासाहेबांना हे देखील सांगतो की मी अहिल्यादेवी आणि श्रीकांत किर्लोस्कर यांचा धाकटा मुलगा आहे. त्यानंतर आदित्य सुद्धा स्वतःची ओळख करुन देतो.
हे ऐकल्यानंतर आबासाहेबांना खूप राग येतो आणि ते सांगतात की, तुम्ही दोघेही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी तुमच्यावर माझ्या मुलासारखं प्रेम केलं आणि तुम्ही सुद्धा विश्वासघात केला. तुमच्या रक्तात तिचच रक्त आहे तिच्याप्रमाणेच तुम्ही माझाही विश्वासघात केला आहे. असं म्हणत ते तिथून निघून जायला सांगतात. अखेर आबासाहेबांनी प्रिया व प्रीतमच नातं अमान्य केलं असल्याच पाहायला मिळत आहे. आता प्रीतम प्रिया यांच्या नात्याला कशी परवानगी मिळणार?, हे दोघं कसे एकत्र येणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.