शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : दिशा-दामिनी मिळून करणार पारूचा अपमान, आदित्य त्यांच्या तावडीतून सोडवू शकेल का?, नक्की काय घडणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 13, 2024 | 11:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

पारू मालिकेत दिशा घेणार पारूचा बदला, ब्रँडसाठीच्या शूटदरम्यान देणार त्रास अन्…

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्य आईला बोलवायला म्हणून अहिल्या देवीच्या खोलीत येतो तेव्हा अहिल्यादेवी त्याच्याशी लग्नाबद्दल बोलतात. तितक्यात पारू सुद्धा अहिल्या देवींना चहा घेऊन आलेली असते. तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, तुझ्या मित्राला कशी मुलगी हवी आहे हे तूच मला सांग. यावर पारू विचारते सर तुम्ही सांगा ना तुम्हाला नेमकी कशी मुलगी हवी आहे. तेव्हा अहिल्यादेवींना तो आरशासमोर उभं करतात. मला अशी मुलगी हवी आहे जी अगदी तुझी सावली आहे. तितक्यात पारू तिथे बघायला येते आणि पारू सुद्धा त्या आरशाच्या फ्रेममध्ये येते. (Paaru Serial Update)

यावर अहिल्यादेवी आपण तुझ्यासाठी अशीच मुलगी शोधू असं सांगतात. त्यानंतर सगळेजण खाली बसलेले असतात. तेव्हा अहिल्यादेवी नवीन ब्रँडच्या मार्केटिंगची जबाबदारी प्रीतम व दिशावर सोपवतात. त्यानंतर दिशा व दामिनी बोलत असतात तेव्हा दिशा ठरवते की, आता या पारूचा काटा आपल्या वाटेतून काढूनच टाकायला पाहिजे. मी माझा विचार केला होता पण ते काही झालं नाही. यावर दामिनी दिशाला भडकवते. आता हीच मी असं शूट करते ज्यामुळे पारूची चांगलीच नाचक्की होईल. त्यानंतर अहिल्यादेवी निघतच असतात. तितक्यात दिशा खाली येते आणि सांगते की, आज आपण पारूच्या नव्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी शूट करुया. यावर अहिल्यादेवी सांगतात की, आज कस जमणार.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात हरवली माणुसकी, टास्कमधील त्या दोन बाळांनाच सगळ्यांनी फाडलं अन्…; ‘बिग बॉस’ मोठी शिक्षा सुनावणार

आज तर आम्ही मिटींगसाठी जात आहोत. यावर दिशा सांगते की, मी हे सगळं काही करुन घेते. तुम्ही एकदा फक्त कास्च्युम बघून घ्या. यावर अहिल्यादेवी कॉस्च्युम बघून घेतात आणि ओके देतात. तर इकडे प्रिया तिच्या घरातून पाठवलेल्या मुलांचे फोटो पाहत असते. तितक्यात तिथं प्रीतम येतो आणि प्रीतम सांगतो की, तुम्ही मुलांचे फोटो पाहताय का यावर प्रिया सांगते की, माझ्या लग्नासाठी मुलं बघण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे घरून हे फोटो आले आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “हिला भीक म्हणून कॅप्टन्सी दिली”, जान्हवी काही सुधरेना, निक्कीनेही दिली तितकीच साथ, अंकिताला बेअक्कलही म्हणाले अन्…

यावर प्रीतम सांगतो की, माझ्या ओळखीत एक मुलगा आहे. त्याचा फोटो दाखवू का?, असं म्हणत तो स्वतःचा फोटो प्रिया मॅडमला दाखवतो. मात्र प्रिया मॅडम हे सगळं काही मजेत घेतात आणि सांगतात की, तुम्ही सुद्धा मला खूप हसवता आणि मला ते खूप आवडतं. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात दिशा व दामिनी मिळून पारूचा कसा अपमान करणार हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Munawar Faruqui apologized after insulting and marathi kokani people know more what he said

Munawar Faruqui : "कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण...", कोकणी माणसाला शिवी व खिल्ली उडवल्यानंतर मुनव्वर फारुकीची माफी, म्हणाला, "त्यावेळी मला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.