शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : आदित्य-प्रीतममध्ये दुरावा, प्रियाबरोबरच नात समोर आलं आणि…; मालिकेत मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 27, 2024 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

अखेर प्रिया-प्रीतमने दिली प्रेमाची कबुली, दोघांचं हे नातं आदित्यसमोरही आलं अन्...

Paaru Serial Update :  ‘पारू’ या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. ‘पारू’ या मालिकेत सध्या असं पाहायला मिळतंय की, दिशाच्या सांगण्यावरुन तिचा मित्र मीहीर प्रीतमला दारू पाजतो आणि ऑफिसमध्ये पाठवून देतो तर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात तेव्हा तिथे दिशा येते आणि दिशा सांगते की, आज प्रीतमच प्रेझेंटेशन आहे आणि त्याचे हे खास प्रेझेंटेशन मला माझ्या फोनमध्ये कैद करुन ठेवायचे आहे. इतकंच नव्हे तर आपण त्याला तिकडे जाऊन सरप्राईज देऊया असं सुद्धा सुचवते. हे ऐकून अहिल्यादेवी, श्रीकांत या सगळ्यांनाच आनंद होतो. त्यानंतर ती अहिल्यादेवींना घेऊन ऑफिसमध्ये जायला निघते.

तर इकडे प्रिया देवासमोर उभी राहून प्रीतम सरांना कोणता धक्का पोहोचू देऊ नकोस, त्यांचे रक्षण कर का कुणास ठाऊक मी त्यांच्या प्रेमात पडले अशी कबुली देते. दिशा बरोबर त्यांचं लग्न झालं तर त्यांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होईल असं देखील ती म्हणते. त्याच वेळेला प्रिया मन मोकळं करण्यासाठी ती नेहमी करत असणाऱ्या त्या व्यक्तीला फोन करते आणि ती व्यक्ती प्रीतमच असते हे अद्याप तिला कळलेलं नसतं. मात्र ती जेव्हा फोन करते तेव्हा प्रीतम तिकडून नशेतच बोलू लागतो. प्रिया म्हणते की, दिशा मॅडमच प्रीतम सरांबरोबर लग्न झालं तर त्यांच आयुष्य उध्वस्त होईल. मी सुद्धा जॉब सोडला आहे आणि अहिल्यादेवींचा शब्द होता म्हणून मला तिथून निघावही लागलं. यावर समोरून विचारलं जातं की, तू इतकी प्रीतमची काळजी का करत आहेस. तेव्हा प्रिया प्रीतमवरील प्रेमाची कबुली देते आणि प्रीतम तिकडून प्रिया मॅडम असं म्हणतो. हे ऐकताच प्रियाला धक्का बसतो तेव्हा प्रियाला कळत की समोरची व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून प्रीतमच आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजने रागाच्या भरात घरातल्या वस्तू फोडल्या, जोरजोरात ओरडला अन्…; निक्की-अभिजीतची जवळीक सहन पाहावेना

त्याच वेळेला प्रियाला कळतं की प्रीतमने दारू प्यायली आहे आणि आता तो प्रेझेंटेशनला जाणार आहे. तेव्हा पारूला प्रिया फोन करुन हे सगळं काही सांगते. पारू आदित्य सरांजवळ जाते आणि आदित्य सरांना सगळं काही सांगते आणि सांगते की, आत्ताच्या आता प्रीतम सरांना शोधलं पाहिजे म्हणून ते दोघेही निघतात. तर इकडे प्रीतम ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो आणि तो प्रेझेंटेशन देणाऱ्या माणसांसमोर स्वतःची नाचक्की करुन घेतो. तितक्यातच तिथे अहिल्यादेवी येतात आणि त्या प्रीतमच्या सणसणीत कानाखाली लगावतात आणि सांगतात की, मला माफ करा. आज मी आई म्हणून आणि या कंपनीची ओनर म्हणून कमी पडले असं म्हणतात. तर इकडे आदित्य व पारू प्रीतमला घरी घेऊन येतात. प्रीतम नशेत असतो तेव्हा आदित्य त्याच्यावर चिडचिड करतो. मात्र पारू आदित्य सरांना सांगते की, ते आता नशेत आहेत त्यामुळे त्यांना आता काही कळणार नाही. आपण यावर उद्या बोलूया. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रीतम व पारू प्रियाला भेटायला आलेले असतात.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं क्रिकेटरसह ब्रेकअप, नंतर दोन लग्न झालेल्या अभिनेत्यांबरोबर अफेअर तरीही एकटीच राहते कारण…

तेव्हा प्रीतम प्रियावरील प्रेमाची कबुली देतो आणि प्रिया सुद्धा प्रीतम वरील प्रेमाची कबुली देते. तितक्यात हे सगळं काही आदित्य ऐकत असतो. आदित्य म्हणतो तू दारू, सिगारेट या मुलीसाठी सोडशील तसंच आई व भावाला सुद्धा सोडशील का?, हे ऐकल्यावर सगळेजण आदित्यकडे पाहून आश्चर्यचकित होतात. मालिकेच्या पुढील भागात आदित्य प्रिया व प्रीतमच लग्न मान्य करेल का हे सारं पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialPaaru Serial todays episodePaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Actress Amruta Deshmukh praised her husband Prasad Jawade saying he is kindest guy on this planet for sweeping clean the house on Mangalagaur day.

नवरा असावा तर असा! मंगळागौरीच्या दिवशी प्रसादने झाडू मारत केली साफसफाई , अमृता कौतुक करत म्हणाली, "लोक त्याच्याबद्दल वाईट..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.