सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : देशमुखांच्या सूनेने जपली परंपरा, जिनिलीया देशमुखने खास अंदाजात साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, “माझंही आयुष्य तुला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 21, 2024 | 5:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia Deshmukh Vatpornima

Video : देशमुखांच्या सूनेने जपली परंपरा, जिनिलीया देशमुखने खास अंदाजात साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, "माझंही आयुष्य तुला…"

अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. बॉलिवूडसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा दबदबा तयार केला आहे. रितेश व जेनेलिया यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच काही ना काही शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. एकमेकांबरोबरचे अनेक रील-व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Genelia Deshmukh Vatpornima)

महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी अशी ओळख या दोघांना मिळाली आहे. दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रितेश व जिनिलीयाने लग्नगाठ बांधली. जवळपास १० वर्षे डेट केल्यावर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी या जोडीने शाही विवाहसोहळा उरकला. मराठीसह बॉलिवूड सिनेसृष्टीतही या जोडीने आपल्या अभिनयाची छाप सोडली. यंदा त्यांच्या संसाराला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. नवरा-बायको व आई-बाबा म्हणून ही जोडी नेहमीच आपलं कर्तव्य पार पाडताना दिसते.

आणखी वाचा – ‘पारू’ने खऱ्या आयुष्यात साधेपणाने साजरी केली वटपौर्णिमा, दिसते इतकी सुंदर, नवऱ्यासह फोटोही काढला, व्हिडीओ चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

अशातच जेनेलियाच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. जेनेलियाने रितेशच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेची पूजा केली आहे. वटपौर्णिमेच्या उपवास धरत तिने वडाला फेऱ्या मारतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. घरातल्या घरात वडाची पूजा तिने केली आहे. याशिवाय तिने घरातल्या देवघरातील देवांचेही आशीर्वाद घेतले आहेत. “माझा प्रिय नवरा रितेश, तुझ्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. तुम्हाला माझं आयुष्यही लाभो”, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘शिवा’ने खऱ्या आयुष्यात लग्नानंतर कधीच वटपौर्णिमा साजरी केली नाही कारण…; स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “एक उपवास केल्यामुळे…”

जेनेलियाने वटपौर्णिमेचे पूजा करताना शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देशमुखांच्या घरातील देवघराचे दर्शन होत आहे. सुंदर अशा सजवलेल्या या देवघराने लक्ष वेधून घेतलं असून मन प्रसन्न केलं आहे. वटपौर्णिमेची पूजा करत जेनेलियाने देशमुखांची परंपरा जपली आहे. अगदी साध्या पद्धतीने आणि घरच्या घरीच तिने ही पूजा केली आहे.

Tags: genelia deshmukhGenelia Deshmukh and riteish deshmukhGenelia Deshmukh Vatpornimamarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
sumona chakravarti on the great indian kapil show

कपिल शर्मावर नाराज आहे सुमोना चक्रवर्ती, ‘द ग्रेट इंडिया कपिल शो’मध्ये न घेतल्याने वादाची ठिणगी, कारण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.