‘झी मराठी’ वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करते. गेल्या अनेक वर्षांपासून या वाहिनीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या वाहिनीवरील सर्वच कार्यक्रम, मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘झी मराठी’ वाहिनीने स्वतःच असं स्थान निर्माण करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाने आजवर समस्त महिलावर्गाला वेड करुन सोडलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता आदेश बांदेकर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवत आहेत. (Paaru Fame Actors Visit Akkalkot)
महाराष्ट्रातील लाखो वहिनींचा हक्काचा आणि लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाने १९ वर्ष पूर्ण करून २०व्या वर्षात पदार्पण केले आहे. आदेश बांदेकर यांच्या अभिनयाचे, सूत्रसंचालनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आदेश यांना महाराष्ट्राचे भावोजी या म्हणूनचं प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाद्वारे ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात.
अशातच सध्या आदेश बांदेकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील प्रसिद्ध पारू या मालिकेतील कलाकारांबरोबर अक्कलकोट येथे पोहोचले आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात आजवर अनेक कलाकार मंडळींनी सहभाग घेतलेला पाहायला मिळाला. यानंतर आता पारू मालिकेतील कलाकारही होम मिनिस्टरच्या आगामी भागात झळकणार आहेत. पारू फेम अभिनेता आदित्य व अभिनेत्री पारू होम मिनिस्टरसाठी सज्ज झाले आहेत.
शरयू सोनवणे, प्रसाद जवादे आणि आदेश बांदेकर या कलाकारांनी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे. स्वामी समर्थांच्या चरणी शरयू सोनावणे व प्रसाद जवादे म्हणजेच आदित्य व पारूने आशीर्वाद घेतले. सध्या मालिकेत पारूच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु असते. मात्र यादरम्यान विघ्न येत आणि हरीशला अंगठी घालणार इतक्यात पारूच्या हातून अंगठी खाली पडते. आता पारूचा हरीशबरोबर साखरपुडा होणार का?, आदित्य व पारूभोवती फिरणार मालिकेचं कथानक नेमकं कसं वळण घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.