शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कोल्हापूरमध्ये बैलगाडी चालवली, हौस भागली अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, काय घडलं पाहा

Saurabh Moreby Saurabh More
मे 23, 2024 | 2:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg boss marathi fame akshay kelkar shared his video of bullock cart driving

Video : कोल्हापूरमध्ये बैलगाडी चालवली, हौस भागली अन्...; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, काय घडलं पाहा

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही त्यांच्याबरोबरचे धमाल किस्से, प्रसंगे किंवा घटना आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. शूटिंगच्या काही गंमतीजमतीही सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर अक खास व्हिडीओ शेअर केला असून त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे आणि हा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अक्षय केळकर.

आपल्या स्टायलिश अंदाजामुळे कायमच चर्चेत असलेला हा अभिनेता त्याच्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अक्षय लवकरच त्याच्या आगामी ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि सध्या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे. यानिमित्ताने अक्षयने कोल्हापुरातील चित्रीकरणाचा एक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर बैलगाडा चालवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “तर हा बैलगाडा, शूटिंगचा भाग नव्हता. कोल्हापुरात ‘अबीर गुलाल’च्या शूटिंगसाठी गेलेलो असताना, सेटच्या जवळून एक दादा त्यांचा हा बैलगाडा घेऊन जात होते आणि खूप इच्छा झाली त्यावर बसायची. म्हणून त्यांना सहज विचारलं. मग काय कोल्हापूरची माणसं म्हणजे विषय आहे का? तर हौस पुरवून घेतली. कॉलेजमध्ये असताना बैलांचं, बैलगाड्याचं अनेकदा चित्र काढलं आहे आणि हा तर कसलाच हँडसम आहे.”

आणखी वाचा – अर्जुनची मैत्रीण त्याच्याच प्रेमात, प्रेमाची कबुलीही दिली, पुढे अप्पीचं काय होणार?

अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. “मस्त…आमचं कोल्हापूर आहेच भारी”, “बैलगाडीवर इतका बिनधास्त बसलेला माणूस मी पहिल्यांदा बघितला”, “जमलंय बर का”, “तू इतका साधा आहेस म्हणूनच तू नेहमी सर्वांच्या कौतुकास पत्र ठरतोस” अशा अनेक कमेंट्स करत अक्षयच्या चाहत्यांनी या व्हिडीओला तुफान प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Video : कोल्हापूरमध्ये बैलगाडी चालवली, हौस भागली अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, काय घडलं पाहा

दरम्यान, कलर्स वाहिनीवर ‘बिग बॉस’चे पर्व गाजवल्यानंतर अभिनेता पुन्हा एकदा त्याच्या अबीर गुलाल मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्याचे प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेत त्याच्याबरोबर अभिनेत्री गायत्री दातार आणि पायल जाधवही असणार आहेत. या मालिकेत अक्षय अगस्त्यची व्यतिरेखा साकारणार आहे      

Tags: akshay kelkarbigg boss marathimarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Anushka Sharma Upset

Video : IPL 2024मधून विराट कोहलीची RCB टीम बाहेर, अनुष्का शर्मा मात्र भलतीच नाराज, स्टेडियममधील व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.