मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२१ वर्षांनंतर ‘पाप’मधील उदिता गोस्वामी नेमकी कुठे आहे?, आता रुपही बदललं, सध्या काय काम करते?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 13, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress udita goswami

२१ वर्षांनंतर 'पाप'मधील उदिता गोस्वामी नेमकी कुठे आहे?, आता रुपही बदललं, सध्या काय काम करते?

बॉलिवूडच्या माध्यमातून अनेक कलाकार जगासमोर आले आहेत. यामध्ये काहींचे करिअर यशस्वी झाले तर काहींच्या वाट्याला अपयश आले. त्यातील एक महत्त्वाची अभिनेत्री म्हणून उदिता गोस्वामीचे नाव घेतलं जातं. जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, तुषार कपूर  यांच्याबरोबर तिने चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र काही कालावधीनंतर तिने चित्रपटसृष्टीला रामराम केला. पण काही वर्षांपूर्वी ती अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. सध्या ती काय करते हे जाणून घेऊया. (actress udita goswami )

उदिताचा जन्म ९ फेब्रुवारी १९८४ रोजी देहरादून येथे झाला. तिचे वडील बनारसचे असून आई शिलॉंगची आहे. तिचे शालेय शिक्षण नववीपर्यंत देहारादून येथे घेतल्यानंतर तिने मॉडेलिंग करण्यास सुरवात केली. त्यानंतर आपले हिंदी चित्रपटामध्ये नशीब अंजमावण्यासाठी मुंबईमध्ये आली.

आणखी वाचा – ‘उतरन’मधील इच्छा व तपस्याला ओळखलंत का?, प्रसिद्धी मिळाली पण इंडस्ट्रीपासून राहिल्या दूर, सध्या दोघीही नेमकं काय करतात?

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????? ???????????????????????????? (@uditaagoswami)

तसेच तिने ‘पेप्सी’, ‘टायटन’ या ब्रॅंडसाठी मॉडेलिंग केले. तसेच एका मॅगजिनमध्ये असलेले तिचे फोटो पाहून पूजा भट्टने  तिला फोन करुन ‘पाप’ या चित्रपटासाठी ऑफर दिली. त्यानंतर लगेच तिने ही ऑफर स्वीकारली. सूत्रांच्या मते तिने आधी तीन ते चार चित्रपटांना नकार दिला होता. मात्र पूजा भट्टची ती चाहती असल्याने तिने तो चित्रपट स्वीकारला. एका मुलाखतीमध्ये आपल्या करिअरबद्दल सांगितले होते की, “१६ वर्षाची असताना मी एका फॅशन इन्स्टिट्यूटसाठी पहिल्यांदा रॅम्प वॉक केले होते.त्यानंतरच तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर MTV मॉडेल फॅशन स्पर्धेसाठी घरी काढलेले फोटो पाठवले आणि त्यामध्ये तिची निवडही झाली होती. Elle magazine कव्हरवर  छापण्यात आलेली पहिली महिला होती”.

आणखी वाचा -आधी निलेश साबळेची एक्झिट, आता ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटचा एपिसोडही झाला शूट

‘पाप’ नंतर दोन वर्षांनी उदिताने इमरान बरोबर ‘जहर’या चित्रपटात दिसून आली होती. त्यानंतर ‘अगर’, ‘किससे प्यार करु’, ‘फॉक्स’मध्येही दिसून आली होती. माहितीनुसार तिला डीजे बनण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने २०१२ मध्ये बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या ती ४० वर्षाची असून ती आपले स्वप्न जगत आहे. डिस्क जॉकी म्हणून ती अनेक कार्यक्रम करते. इन्स्टाग्रामवर तिचे २३१ हजार फॉलोअर्स आहे.  

Tags: actressbollywoodbollywood actressmodelmodelingmodeling careerpaappaap movieUdita goswami
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Today 14 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशी भविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीमध्ये होणार भरपूर फायदा, तर 'या' राशीला धनलाभ मिळणार, तुमच्या नशिबाामध्ये काय बदल होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.