मनोरंजन विश्वात उत्कृष्ट सिनेमांचा, कलाकारांचा वेळोवेळी सन्मान केला जातो. असाच एक मनाचा समजला जाणारा सन्मान म्हणजे ‘ऑस्कर’. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ऑस्कर पुरस्कार मिळवण्याचा मान ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ या नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंट्रीने मिळवला. हत्ती आणि त्यांचं संगोपन करणारं कुटुंब बोमन आणि बेली यांच्यावर आधारित ही डॉक्युमेंट्री होती. या डॉक्युमेंट्रीची निर्मिती सख्या एंटरटेनमेंट यांनी केली असून दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केले होते. काही महिन्यांपूर्वी या डॉक्युमेंट्रीला ‘ऑस्कर’ मिळाला आणि जगभरातून या गोष्टीच कौतुक देखील करण्यात आलं. परंतु आता पुन्हा एकदा ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ ही डॉक्युमेंट्री चर्चेत आली आहे. ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ यामधील बोमन व वेली यांनी निर्माते, दिग्दर्शक यांच्या विरोधात तक्रार करत पैसे न दिल्याचा आरोप केला आहे.(The Elephant Whisperers controversy)
बोमन व बेली या जोडप्याने चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांच्या विरोधात तक्रार करत २ करोड रुपयांची मागणी केली आहे. या जोडीने यासंदर्भात एक मुलाखत देखील दिली या मुलाखतीत त्यांनी सांगितले कि “चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सगळे आमच्याशी आदराने, प्रेमाने वागत होते मात्र ऑस्कर मिळाल्यानंतर सगळे आम्हाला दुर्लक्ष करू लागले आणि आमच्याशी नंतर ठेऊन वागू लागले. एवढंच काय यांनी आमचे चेहरे दाखवून ऑस्कर मिळवला पण आम्हाला पुरस्काराला हात देखील लावून दिला नाही. पुरस्कारा नंतर आमच्याकडे घरी परत जाण्याचे देखील पैसे नव्हते. आम्ही कार्तिकीकडे पैशाची मागणी केली परंतु तिने सांगितलं तिच्याकडे पैसे नाहीत पण ती लवकरच व्यवस्था करेल.(the elephant whisperers oscar)
हे देखील वाचा- सचिन तेंडुलकरने व्हिडिओ कॉलद्वारे केलं दीपा परबचं कौतुक,पोस्ट शेअर करत दीपा म्हणाली “चित्रपटाने भरपूर काही दिलंय पण….”

पुढे आरोप करत या जोडप्याने सांगितली “फिल्म मध्ये लग्नाचा सीन शूट करायचा होता परंतु कार्तिकीकडे पैसे नसल्याचं तिने सांगितलं आणि आम्हाला पैशाची व्यवस्था होऊ शकते का विचारत मी तुम्हाला ते पैसे परत देईन. त्या साठी आम्ही नातवाच्या सशिक्षणासाठी ठेवलेले १ लाख रुपये त्यांना दिले परंतु आता आम्ही परत पैसे मागत आहोत तर आमचे फोन देखील ती उचलत नाही. कार्तिकेने सांगितल्या प्रमाणे आम्हाला फिल्मचे देखील पैसे पूर्ण मिळाले नाहीत केवळ ६० हजार रुपये आमच्या बँक खात्यात जमा झाले.(the elephant whisperers director)
हे देखील वाचा- “जन्मतः लेकीच्या हृदयात दोन छिद्र अन् तीन महिन्याची असताना…” अभिनेत्री बिपाशा बासूने सांगितला आयुष्यातील दुःखद प्रसंग
तर आता निर्माते व कार्तिकी या तक्रारी विरोधात काय उत्तर देणार याची वाट बोमन व बेलीसह संपूर्ण जग पाहत आहे.