शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

यंदाच्या ऑस्कर २०२४ सोहळ्यात नितीन चंद्रकांत देसाईंना आदरांजली अर्पण, उपस्थित मान्यवर व कलाकारही भावुक

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 11, 2024 | 10:49 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Oscars 2024 art designer nitin chandrakant desai remembered during moving in memoriam segment

यंदाच्या ऑस्कर २०२४ सोहळ्यात नितीन चंद्रकांत देसाईंना आदरांजली अर्पण, उपस्थित मान्यवर व कलाकारही भावुक

नितीन चंद्रकांत देसाई… कलाविश्वात कलादिग्दर्शक म्हणून ध्रुवताऱ्यासारखे अढळपद मिळवणारे व्यक्तीमत्त्व. ऑस्करच्या अंतिम नामांकनात धडक मिळवणारा आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘पानिपत’ किंवा संजय लीला भन्साळींच्या ‘देवदास’ चित्रपटातील देखण्या व भव्य वास्तू या नितीन यांच्या कलादिग्दर्शनाशिवाय होऊच शकले नसते. जेव्हा जेव्हा ठरावीक काळातील वास्तू, शहरे, रचना उभारण्याचे आव्हान निर्माता-दिग्दर्शकांसमोर उभे राहिले. त्यावर नितीन चंद्रकांत देसाई हे एक उत्तर ठाम होते.

मराठी मनोरंजनविश्वासह हिंदी कलाविश्वातदेखील आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नितीन देसाईंनी हॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला. आपल्या कामाच्या जोरावर नितीन यांना हॉलिवूडमध्येही कलादिग्दर्शक म्हणून बोलवण्यात आले. त्यांनी ‘सलाम बॉम्बे’, ‘कामसूत्र’, ‘जंगल बुक’, ‘सच लॉंग जर्नी’ अशा काही निवडक आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले.  त्यातही खास लक्षात राहिला तो डॅनी बोएल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा चित्रपट. 

Nitin Desai in the In Memorium segment – wonderful to have his monumental work recognized internationally.#Oscars2024

— Anupama Chopra (@anupamachopra) March 11, 2024

मात्र गतवर्षी या अवलिया कलाकाराने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे यंदाच्या यंदाच्या ९६व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नितीन देसाईंच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली. ‘इन मेमोरियम’ नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जाते. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा उल्लेख करण्यात आला.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असणार खास, तर ‘या’ राशीच्या लोकांची होणार प्रगती, जाणून घ्या

गेल्यावर्षी, २ ऑगस्ट २०२३  रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं. ‘लगान’ हा चित्रपट २००२ साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. ‘लगान’ने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या श्रेणीत अंतिम पाच चित्रपटांत स्थान मिळवले होते. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शनही देसाईंनीच केलं होतं. ‘स्लमडॉग मिलेनियर’या चित्रपटाला ओरिजनल स्कोअर श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

आणखी वाचा – Oscar 2024 : ऑस्करमध्ये ‘ओपेनहायमर’ने मारली बाजी, कोण ठरलं सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक, वाचा संपूर्ण यादी

दरम्यान, यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर ‘ओपनहायमर’ चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर ‘ओपनहायनमर’ने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. त्याशिवाय, ‘ओपनहायनर’ने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात पाच पुरस्कार जिंकले आहेत.

Tags: Art DirectorMarathi Art Directormarathi entertainment newsNitin Chandrakant DesaiNitin Chandrakant Desai TributeOscars 2024Oscars 2024 Marathi NewsOscars Awards CeremonyOscars Entertainment Newsऑस्कर २०२४ऑस्कर २०२४ मराठी बातमीऑस्कर पुरस्कार सोहळाऑस्कर मनोरंजन बातमीकला दिग्दर्शकनितीन चंद्रकांत देसाईनितीन चंद्रकांत देसाई आदरांजलीमराठी कला दिग्दर्शक
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Oscar award 2024 nominee

ऑस्कर नामांकन मिळालेल्या व्यक्तीच्या ‘गुडी बॅग’मध्ये नक्की असतं तरी काय?, कोटी रुपयांच्या भेटवस्तू अन्...   

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.